सिनेमात काम पाहिजे तर कपडे काढून दाखव; साजिद खानवर मॉडेलचा आरोप

Sajid Khan accused of sexual harassment by Indian model Paula
सिनेमात काम पाहिजे तर कपडे काढून दाखव; साजिद खानवर मॉडेलचा आरोप

देशातील #MeToo मोहिमे दरम्यान २०१८मध्ये बॉलिवूड दिग्दर्शन साजिद खानवर एका महिलेने नाही तर तीन महिलेने लैगिंक छळ केल्याचा आरोप केला होता. एका पत्रकारासह अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर आरोप केले होते. या #MeToo मोहिमेत लावलेल्या आरोपांमुळे हाऊसफुल्ल ४ मधून निर्मात्यांनी दिग्दर्शक म्हणून साजिदचे नाव काढून होते. तेव्हापासून साजिद आतापर्यंत माध्यमांसमोर जास्त आला नाही आहे. आता पाऊला नावाच्या एका भारतीय मॉडेलने एक लांबलचक इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून साजिद खानावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. चित्रपटातील भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने कपडे उतरविण्याची तिच्यासमोर अट ठेवली होती.

पाऊलाने #MeToo मोहिम दरम्यान शांत राहिल्याचे कारण देते सांगितले की, ‘तिचा कोणी गॉडफादर नव्हता. तिला कुटुंबियांसाठी पैसे कमवायचे होते. त्यामुळे त्यावेळेस तिने याचा खुलासा केला नाही. आता ती चित्रपट निर्मात्याविरोधात बोलण्याची हिम्मत करू शकते कारण तिचे आई-वडील तिच्यासोबत आहे.’ दरम्यान पाऊलाने साजिदवर आरोप लावताना सांगितले, ‘जेव्हा ती १७ वर्षांची होती तेव्हा साजिदने तिचा छळ केला. तसेच तिच्याशी गलिच्छ बोलणे आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला.’

पुढे तिने असे सांगितले की, ‘हाऊलफुल्लमध्ये भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने तिला आपल्यासमोर कपडे उतरविण्यास सांगितले होते. अशा प्रकारे किती मुलींसोबत त्याने केले असावे याची तिला काहीच कल्पना नाही आहे. साजिद खान सारख्या लोकांना कास्टिंग काऊचसाठी नाही तर लोकांना फसविण्यासाल्यामुळे तुरुंगात टाकले पाहिजे.’ यामुळे आता पुन्हा एकदा बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान चर्चेत आला आहे.


हेही वाचा – दीपिका निघाली गोव्याला, चाहत्यांना मिळणार खास सरप्राईझ!