‘गर्ल्स’ चित्रपटाच्या पोस्टरवर सलील कुलकर्णी यांचा तीव्र निषेध

येत्या २९ नोव्हेंबर गर्ल्स हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला आहे.

Mumbai
saleel kulkarni angry on marathi movie girls poster on facebook post
'गर्ल्स' चित्रपटाच्या पोस्टरवर सलील कुलकर्णी यांचा तीव्र निषेध

‘बॉइज’, ‘बॉइज २’च्या यशानंतर आता ‘गर्ल्स’ चित्रपट येणार आहे. नुकतेच विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये नवोदित अभिनेत्री अंकिता लांडे दिसत आहे. मात्र तिच्या टी-शर्टवर ‘आयुष्यावर बोलू काही’ अशी टॅगलाईन दिली असून असभ्य हालचाली केल्या आहेत. यामुळे सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण, सोळा वर्ष ‘आयुष्यावर बोलू काही’ हा स्टेज शो रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. त्यामुळे या स्टेज शोचे नाव टॅगलाईन म्हणून वापरून असभ्य हालचाली करणार हे पोस्टर अजिबात योग्य नाही आहे, असं सलील यांनी मतं व्यक्त केलं आहे.

सलील यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, ‘नाती, आई-बाबा, घर या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा – आयुष्यावर बोलू काही. या अभिजात चित्रपटातील ही सुसंस्कृत व्यक्ती familysucks and आयुष्यावर बोलू काही असं लिहिलेला टी-शर्ट घालून असभ्य हालचाली करते. आपल्या या कार्यक्रमाबद्दल हा आदर? गेली सोळा वर्ष हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाचा असा अपमान काय विचार असेल यात? आम्ही सर्वजण मी, संदीप खरे, आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ आणि मित्रमंडळी याचा तीव्र निषेध करतो.’

नक्की वाचा बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले बॉलिवूडचे शेहनशाह

सलील कुलकर्णी यांनी केलेल्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर  ‘गर्ल्स’ पोस्टर योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. येत्या २९ नोव्हेंबरला ‘गर्ल्स’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेची पत्नी होणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री