घरताज्या घडामोडी'शोले'चा सुरमा भोपाली अभिनेते जगदीप यांचे निधन

‘शोले’चा सुरमा भोपाली अभिनेते जगदीप यांचे निधन

Subscribe

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८१ वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते कॅन्सर या आजाराने त्रस्त होते. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. ‘सुरमा भोपाली’ हा त्यांच्या गाजलेला चित्रपट होता. विनोदाची उत्तम जाण असलेले म्हणून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. अभिनेते जगदीप यांनी जवळपास ४०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

२९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशच्या दतिया गावात जगदीप यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव सय्यद इश्ताक अहमद जाफरी असे होते. जगदीप यांनी बी.आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ चित्रटातून बालकलाकर म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘अब दिल्ली दूर नही’, ‘मुन्ना’, ‘आरपार’, ‘दो भीगा जमीन’, ‘हम पंछी एक डाल के’ यासारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९७५ मध्ये त्यांनी ‘शोले’ चित्रपटात सुरमा भोपालीची भूमिका साकारली. या भूमिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. मग काही वर्षांनी सुरमा भोपाली नावाचा चित्रपट आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले होते. ‘अंदाज अपना अपना’, ‘पुराना मंदिर’, ‘कुर्बानी’, ‘शहेनशा’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘कान्होजी आंग्रे’ यांच्या शौर्याची जीवन गाथा लवकरच…!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -