घरमनोरंजन'फिट अप विथ द स्टार्स' मध्ये जॅकलिन फर्नांडीस

‘फिट अप विथ द स्टार्स’ मध्ये जॅकलिन फर्नांडीस

Subscribe

'फिट अप विथ द स्टार्स' या वूटवरील शो मध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसबाबत प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. हा शो अनायता श्रॉफ होस्ट करत आहेत.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्याचे पैलू वूट ओरिजिनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. वूट ओरिजिनल ‘फिट अप विथ द स्टार्स’ या कार्यक्रमामधील दहा एपिसोडच्या मनोरंजनामध्ये विविध सेलिब्रिटींनीबाबत प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. हा शो फॅशनीस्टां अनायता श्रॉफ अदजानीया होस्ट करीत आहेत. तर या शोमध्ये बॉलीवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सहभागी होणार आहे. यावेळी जॅकलिनशी संवाद साधला असून तिने काही प्रश्नांना उत्तर दिली आहेत.

- Advertisement -

जॅकलिनचे नातेसंबंध

जॅकलिन फर्नांडिस एक स्वतःच दिवा आहे. जेव्हा अनायता श्रॉफ अदजानीयाने जॅकलिनला तिच्या नाते संबंधांबद्दल विचारणा केली तेव्हा तिने म्हटले की, “एखाद्या संबंधांमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे अधिक चांगली गोष्ट आहे.”

जॅकलिनला कोणत्या डेट्स आवडतात

जॅकलिन फर्नांडिस देशातील तरुणांच्या हृदयावर राज्य करीत आहे. अनायाता श्रॉफ अदजानियाच्या आपल्या कार्यक्रमात वूट वरील ‘फिट अप विथ द स्टार्स’ नावाच्या एका कार्यक्रमात अनैताने जॅकलिनला विचारले की तुला कोणत्या प्रकारची लोकं आणि कशा प्रकारच्या डेटिंग्स करायला आवडतात? जॅकलिनने सांगितले की, मी कित्येकदा प्रवास करते आणि मला आयुष्यातील महत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टीं मधून देखील खूप आनंद मिळतो. एखाद्या व्यक्तीबरोबर जर डेटवर जायची इच्छा असेल तर तो व्यक्ती परिपूर्ण नसेल तरी चालेल पण, जो चांगले कपडे घालू शकतो आणि ती त्याच्यासोबत बिनधास्त असू शकते, अशा व्यक्तीसोबत डेटवर जाणे पसंत करेन.तिला विशेष आवडत्या व्यक्ती सोबत नॉर्थन लाईट बघण्याची इच्छा आहे.

- Advertisement -

जॅकलिनबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

‘फिट अप विथ द स्टार्स’ शोवर तिने तिच्या जीवनाबद्दल आपल्याला माहित नसलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. जॅकलीनने बाराव्या वर्षी काम करायला सुरवात केली, जॅकलिन बहुभाषी आहे, स्पॅनिश, फ्रेंच, अरेबिक इ. तिला चांगल्या प्रकारे बोलता येते. जॅकलीनला पोल डान्स खूप आवडतो. जॅकलीनला बिंग हाऊस शो बघायला आवडतो आणि जेव्हा तीला काहीच करावेसे वाटत नाही तेंव्हा ती गोड पदार्थ खाते.

तुम्हाला स्वाईप करण्यासाठी काय गरजेचं आहे

जॅकलिन फर्नांडिस स्वतःच दिवा आहे. जेव्हा अनैता श्रॉफ अदजॅनियाने जॅकलिनला विचारले तुला टिंडरवर स्वाइप करण्यासाठी काय भाग पाडेल? त्यावर जॅकलिन म्हणाली, “एक मनोरंजक प्रोफाइल असलेल्या आणि टिंडरवरील क्रिएटीव्ह फोटो असलेली व्यक्ती मला स्वाइप करायला भाग पडू शकते”.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -