घरफिचर्सभारतीय सैन्याच्या गौरवाचा दिन

भारतीय सैन्याच्या गौरवाचा दिन

Subscribe

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. पण देशाच्या संरक्षणाची सूत्रे भारतीयांच्या हाती येण्यासाठी १५ जानेवारी १९४९ हा दिवस उजाडावा लागला. त्या दिवशी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटिश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी ही सूत्रे स्वीकारली होती. या ऐतिहासिक दिनाची आठवण म्हणून १५ जानेवारी हा दिवस भारतीय सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

आपल्या भारतीय सैनिकांचे आभार मानावे तेवढे कमीच. सैनिक केवळ देशाच्या सीमारेषेचे संरक्षण करत नाहीत. तर त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळातही जवान सर्वसामान्य नागरिकांची मदत करतात. तेव्हा त्यांच्या त्यागाची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी आजच्या दिवसाएवढा महत्त्वाचा दिवस दुसरा कोणताच ठरू शकत नाही. कारण आज आहे भारतीय सैन्य दिन. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. पण देशाच्या संरक्षणाची सूत्रे भारतीयांच्या हाती येण्यासाठी १५ जानेवारी १९४९ हा दिवस उजाडावा लागला. त्या दिवशी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटिश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी ही सूत्रे स्वीकारली होती. या ऐतिहासिक दिनाची आठवण म्हणून १५ जानेवारी हा दिवस भारतीय सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
दरम्यान, १७७६ मध्ये कोलकाता येथे ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली होती. भारतीय सैन्याच्या ५३ छावण्या असून ९ सैन्य तळ आहेत. १२५ कोटी नागरिकांना शांततेत राहता यावे यासाठी भारतीय सैन्य स्वतःचा जीव धोक्यात घालतात. भारतीय सैन्याचा इतिहास गौरवशाली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारत अनेक युद्धजन्य परिस्थिती आणि युद्धांना सामोरे गेला आहे. यामध्ये चीन आणि पाकिस्तान सोबत झालेले युद्ध, कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेली घुसखोरी या सर्वांचा भारतीय जवानांनी मोठ्या धाडसाने सामना केला. स्वातंत्र्योत्तर काळात देशात शांतता नांदावी यासाठी सुद्धा भारतीय सैन्याने मोलाची कामगिरी बजावली. केवळ युद्धजन्य परिस्थितीतच नाही. तर हिमालयातील गोठविणारी थंडी, थरच्या वाळवंटाची उष्णता आणि ईशान्येतील दाट जंगल या सर्व परिस्थितीत सैन्याला रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करावे लागते.
१९४९ मध्ये भारतीय भूदलात दोन लाख सैनिक होते. तीच संख्या आज १३ लाखांहून अधिक आहे. या दिनानिमित्त भारतीय सेनेचे जवान विविध कवायती आणि कार्यक्रम सादर करतात. यामध्ये बीएलटी टी-७२, टी-९० टँक, ब्रह्मोज मिसाइल, कॅरियर मोटार ट्रॅक्ड वहिकल, १५५ एमएम सोलटम गन आदींचे प्रदर्शन करण्यात येते. या दिवसाची सुरुवात ही खास ठरते. या दिवशी सकाळी नवी दिल्लीतील अमर जवान ज्योति या ठिकाणी भारताच्या हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत या दिवसाची सुरुवात करण्यात येते. त्यानंतर सैनिकांचे संचलन आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी शूरवीर सैनिकांचा सन्मान करण्यात येतो. याद्वारे शूरवीर सैनिकांना सेना पदक आणि युनिट क्रेडेन्शिअल्स (व्यक्तीचा प्रामाणिकपणा) यासारखे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. परकीय शत्रूंप्रमाणेच स्वकीयांकडूनही होणार्‍या आक्रमणापासून भारतीय सैनिक जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेतात. तेव्हा देशाचे नागरिक म्हणून प्रत्येकाने सैनिकांच्या कामगिरीचे गोडवे गाऊया. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करुया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -