आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- तुम्ही वेगाने तुमची योजना पूर्ण करा. भेट यशस्वी होईल. मैत्री वाढेल. तुमच्या बुद्धिचे कौतुक होईल.

वृषभ :- क्षुल्लक कारणाने वाद वाढू शकतो. खिसा-पाकीट सांभाळा. प्रवासात दुखापत होऊ शकते.

मिथुन :- राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. घरातील गैरसमज दूर करा. धंदा वाढेल.

कर्क :- कोर्टाच्या कामात अडचण वाढू शकते. नोकरीत काम करण्यात सावध रहा. चूक टाळा.

सिंह :- अनुभवी लोकांचा सल्ला उपयोगी पडेल. धंदा वाढवा. वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल.

कन्या :- कायद्याच्या कचाट्यात सापडू नका. मुलांची प्रगती पाहून समाधान मिळेल. वाटाघाटीत यश येईल.

तूळ :- नवीन ओळख होईल. सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल.

वृश्चिक :- पैशाची गुंतवणूक करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. थकबाकी वसूल करा.

धनु :- मनावरील ताण हलका होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. लोकप्रियतेत वाढ होईल.

मकर :- रागाच्या भरात कुणाचाही अपमान करू नका. सहनशीलता ठेवा. रस्त्याने चालताना काळजी घ्या.

कुंभ :- आजचे काम करण्यात यश येईल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. धंद्यात प्रगती होईल.

मीन :- धंद्यात वाढ करता येईल. मोठ्या लोकांच्या आश्वासनावर जास्त अवलंबून राहू नका. प्रेमाला चालना मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here