घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Subscribe

मेष :- विरोध सहन करावा लागेल. तुमचा मुद्दा निकामी ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. जिद्द सोडू नका.

वृषभ :- आजच्या दिवसाचे काम वेळच्या वेळी करा. कामगारांच्या गैरसोयीची चौकशी करा. यशस्वी दिवस.

- Advertisement -

मिथुन :- प्रवासात घाई करू नका. वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याची तयारी ठेवा. प्रेमाने बोला.

कर्क :- अपेक्षित माणसाची भेट झाल्याने तुमची समस्या सोडवता येईल. नातलगांचा सहवास मिळेल.

- Advertisement -

सिंह :- योजनेला मार्गी लावता येईल. धंद्यातील येणे वसूल करा. नवे काम छोट्या कारणाने सोडू नका.

कन्या :- तुम्ही घेतलेले परिश्रम उपयोगी येतील. स्वतःच्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या. व्यवहार तपासा.

तूळ :- तुमच्या मनावर दुसर्‍याच्या बोलण्याचा परिणाम होईल. तटस्थ रहा. कमी बोलणे हिताचे असेल.

वृश्चिक :- आजचे काम आळसाने थांबवू नका. मेहनत घ्या. क्षुल्लक प्रश्नावर नको ती चर्चा कशाला.

धनु :- तुमच्या वागण्याची बदललेली पद्धत सर्वांच्या लक्षात येईल. मुलाच्या प्रगतीने मन भरून येईल.

मकर :- सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल. कोर्टाचे काम संपवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ :- थकवा वाटेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल.

मीन :- सकाळचे काम आजच करा. चर्चा यशस्वी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -