जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- जवळच्या विश्वासातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. आनंदी व्हाल. धंद्यात प्रगती होईल.

वृषभ :- रागाच्या भरात कोणतेही अघटित कृत्य करू नका. प्रवासात काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल.

मिथुन :- धाडसी महत्त्वाचे ठरेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत वरिष्ठ खुष होतील.

कर्क :- नोकर माणसांना सांभाळून बोला. धंदा मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धि मिळेल.

सिंह :- अडचणीवर मात करता येईल. जवळचे लोक तुम्हाला नकोसे वाटतील. प्रतिष्ठा सांभाळा.

कन्या :- धंद्यात नवा पर्याय मिळेल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. ठरविलेले काम करता येईल.

तूळ :- मनाची चंचलता होईल. उतावळेपणाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. चातुर्य वापरा.

वृश्चिक :- रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. प्रवासात घाई नको. मन अस्थिर होईल.

धनु :- नातलगांच्या सहवासाने आनंदी रहाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. अडचणी कमी होतील.

मकर :- मुलांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. दौर्‍यात यश मिळेल. योजना पूर्ण करता येईल.

कुंभ :- विचारांना चालना मिळेल. नको असलेल्या व्यक्तीला टाळता येईल. कोर्टाचे कागद जमा करता येतील.

मीन :- जवळच्या किंवा नोकर माणसांना कमी समजू नका. दुखवू नका. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.