जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- तुमचा मुद्दा पटवून देताना जास्त कष्ट घ्यावे लागतील. दादागिरी कुठेही करू नका. मैत्री वाढवा.

वृषभ :- महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट घेता येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. स्पर्धेत जिंकाल.

मिथुन :- सामाजिक कार्यात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कला क्षेत्रात नवीन ओळख होईल. मैत्री वाढेल.

कर्क :- मनावरील दडपण कमी झाल्याने काम करण्याचा उत्साह वाढेल. धंद्यात लक्ष द्या. हिशोब तपासा.

सिंह :- वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाचे दडपण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या :- घरातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात लक्ष द्या. खाण्या-पिण्याची काळजी घ्या.

तूळ :- सामाजिक कार्यात आरोप येण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. वेळच्या वेळी कामे करा.

वृश्चिक :- ताण-तणावाला सामोरे जाता येईल. आजचे काम आजच करून घ्या. वेळच्या वेळी कामे करा.

धनु :- नवीन मित्रांची ओळख वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. नवीन नोकरी शोधता येईल.

मकर :- सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकांचे प्रेम मिळवता येईल. धंद्यात नवे धोरण ठेवता येईल. स्पर्धा जिंकाल.

कुंभ :- धंद्यात सुधारणा करू शकाल. मान-प्रतिष्ठा वाढेल. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा साहित्यात चमकाल.

मीन :- घरातील वाटाघाटीत नाराजी, तणाव होऊ शकतो. धंद्यात येणार्‍या अडचणी कमी करू शकाल. पैसा सांभाळून ठेवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here