राशिभविष्य 9 डिसेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018

mumbai
9 Dec

मेष ःरविवारी घरातील कामे करून घेता येतील. नातलगांची भेट घडेल. धंद्यात फायदा होईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करा. चंद्रमंगळ लाभयोग, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. संघर्ष असला तरी सौम्य शब्दात प्रेमाने तुम्ही तुमचे मत राजकीयसामाजिक क्षेत्रात मांडू शकाल. लोकांना एकत्र करू शकाल. धंद्यात दुर्लक्ष नको. काम मिळवा. थकबाकी वसूल करू शकाल. नोकरीतील कामे मार्गी लावता येतील. कलाक्रिडा क्षेत्रात प्रयत्नांचे कौतुक होईल. यश सोपे कुठेच नाही हे लक्षात ठेवा. कोर्टकेसमध्ये योग्य सल्ला घ्या. संशोधनाच्या कामात तपासच्या धागा कामी येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासचा आळस करू नये. भांडण वाढवू नये. शुभ दि. १०, ११

वृषभ ः रविवार अचानक कामे वाढतील. घरातील व्यक्तींच्या बरोबर तणाव होऊ शकतो. धंद्यात गिर्‍हाईकाशी गोड बोला भांडू नका. चंद्रगुरू लाभयोग, चंद्र मंगळ युती दोन आहे. मंगळवारपासून कामे वेगाने होतील. याच सप्ताहात राजकीयसामाजिक कार्यात प्रगतीकारक घटना घडेल. योजनांना पूर्ण करा. धंद्यात मेहनत घ्या. फायदा होईल. कलाक्रिडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. मोठे लोक आश्वासन देतील. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. संशोधनाच्या कामात लक्ष द्या, यश मिळेल. स्वतः कष्ट घ्या. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचा आळस करू नये. खाण्याची काळजी घ्यावी. वडील माणसांपासून एखादी गोष्ट लपवू नये. शुभ दि. 11, १३

मिथुन ःरविवारी मनाप्रमाणे कामे करता येतील. घरातील नाराजी दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यात आळस करू नका. चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र शुक्र त्रिकोणयोग बेसावध राहू नका. तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कार्य करण्यात तत्परता दाखवा. धंद्यात फायद्यासाठी कोणताही करार करू नका. फसगत होऊ शकते. घरातील व्यक्तींची मदत मिळेल. कलाक्रिडा क्षेत्रात ताण होऊ शकते. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. बोलताना मागचा पुढचा विचार करा. संशोधनाच्या कामात प्रगती करू शकाल. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी तरच परीक्षेत पास होता येईल. शुभ दि. 13, १४

कर्क ः रविवारी गुप्त कारवायांचा त्रास होईल. शेजारी त्रस्त करतील. वाहन जपून चालवा. कोणतेही काम करताना काळजी घ्या. दुखपत संभवते. चंद्र, बुध, लाभयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात किरकोळ तणामुळे अडचणी येतील. यांत्रिक बिघाड होऊ शकतो. मोठे काम हातचे जाऊ देऊ नका. राजकीयसामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहिल. पण जिद्दीने काम करा. कलाक्रिडा क्षेत्रात प्रगती होईल. एखादी दुखापत संभवते. कोर्टाच्या कामात चिंता वाढू शकते. बेसावध राहू नका. संशोधनाच्या कामात मेहनत पडेल पण प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणे वागू नये. घरातील वातावरण थोडे गढूळ राहू शकते. शुभ दि. 11, १२

सिंह ः रविवार मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न करता येईल. रेंगाळात राहिलेले काम पूर्ण करण्याची तयारी करता येईल. धंद्यात लक्ष द्या. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. तुमचे मनोबल या सप्ताहात वाढेल. महत्वाची कामे राजकीयसामाजिक कार्यात सुरू करता येतील. कोणालाही कमी लेखून चालणार नाही, याची काळजी घ्या. धंद्यात आळस करू नका. काम मिळवा. तुमची हुशारी तुम्ही वापरा. कलाक्रिडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. कोर्टाच्या कामात योग्य सल्ला घेऊन बोला. अरेरावी नको संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ शकते. घरातील व्यक्ती तुमची काळजी घेतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जोमाने अभ्यास करावा. शुभ दि. ११, १२

कन्या ःरविवार कठीण काम करून घेता येईल. धंद्याला महत्व घ्या. एखादे ठरविलेले काम पूर्ण करता येईल. नवीन ओळखी होतील. सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र शुक्र, त्रिकोणयोग होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात तणावाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. सन्मानाने बोला. योग्य उत्तर देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. धंद्याला कलाटणी देता येईल. थकबाकी मिळवणे कठीण पडू शकते. कलाक्रिडा क्षेत्रात यश मिळेल. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. घरातील व्यक्तींच्या सुखासाठी चांगला विचार कराल. कोर्टकेसमध्ये जिद्दीने यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे. यश संपादन करावे. संशोधनाच्या कामात अडचणी येऊ शकतात. शुभ दि. 11, १२

तूळ ःरविवार तुमच्या मनासारखा घालवता येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. आप्तेष्ठांची भेट होईल. सामाजिक कार्यात जम बसेल. सूर्यचंद्र लाभयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात वेगाने कामे करण्यास सुरुवात करा. योजना पूर्ण करा लोकांची भेट घ्या. लोकप्रियता वाढेल. धंद्यात मेहनत घ्या. मोठेकाम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. कलाक्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध मिळेल. नवे काम मिळेल. कोर्टकेस जिंकाल. नोकरी लागेल. घरातील समस्या सोडवता येईल. आनंदी वातावरण राहील. घर, वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येईल. वरिष्ठ कौतुक करतील. दुरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. १२,१३

वृश्चिक ःरविवारी तुमच्या कामात प्रगती होईल. धंद्यात नवीन लोकांची मदत मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमचा अंदाज बरोबर येईल. चंद्र शनि, लाभयोग, चंद्र, मंगळ, युती होत आहे. राजकीयसामाजिक कार्याला योग्य दिशेने नेता येईल. दर्जेदार व्यक्तीचा सहवास मिळेल. धंद्यातील चुका सुधारता येतील. संसारात एखादी चिंता कमी होण्याची शक्यता दिसेल. कलाक्रिडा क्षेत्रात प्रगती होईल. धाडसी निर्णय घ्याल. कोर्टाच्या कामात भावनांना महत्व देऊ नका. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होऊ शकतो. संशोधनाच्या कामात आळस करू नका. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा.

धनु ःरविवार तुम्ही ठरविलेले काम करून घेता येईल. नेहमी मदत करणारी व्यक्ती सहाय्य करेल. जास्त भरवसा कोणावरही ठेऊ नये. चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. कुटुंबातील वाटाघाटीचा प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. विचारविनिमय करून सर्वांना सर्व समजावून सांगा. धंद्यात येणार्‍या अडचणीवर उपाय शोधता येईल. आळस करून चालणार नाही. व्यवहारात भावनांना आणू नका. कलाक्रिडा क्षेत्रात आशादायक वातावरण राहिल. कोर्टाच्या कामात मदत मिळू शकेल. नोकरीत सावधपणे कोणताही निर्णय घ्या. संशोधनाच्या कामात दिशा मिळू शकेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासच करावा सोपा मार्ग शोधू नये. शुभ दि. 11, १३

मकर ःरविवारी खर्च वाढेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. नको असलेली व्यक्ती तुम्हाली भेटेले. तुमचा वेळ घेईल. चंद्र, बुध लाभ योग, चंद्र, मंगळ, युती होत आहे. किरकोळ वादाला जास्त महत्व देऊ नका. राजकीयसामाजिक कार्यात योजनांना वेग द्या. चर्चा करा. मोठा निर्णय घेता येईल. धंद्यात चांगली सुधारणा होऊ शकेल. तसे प्रयत्न चालू ठेवा. कलाक्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कोर्टाच्या कामाला संपवता येईल. विरोधक तह करण्यास येतील. संशोधनात तुमचे काम पाहून वरिष्ठ खूष होतील. विद्यार्थी वर्गाने ध्येयावर लक्ष द्यावे. उच्च पदाला जाता येईल. शुभ दि. १३, १४

कुंभ ः रविवारी आजचे काम आजच करण्याची तयारी ठेवा. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. विचारांना चालना मिळेल. सूर्यचंद्र लाभयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात मोठा पल्ला गाठण्याचा निर्णय घेता येईल. राजकीयसामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. विचारांनी देवाणघेवाण करून योग्य निर्णय घेता येईल. कलाक्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध मिळेल. मोठे काम मिळेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. घरात शुभ समाचार मिळेल. वास्तु, जमीन, वाहन खरेदीचा विचार पूर्ण करता येईल. संशोधनाच्या कामात सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवायांचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश परीक्षेत मिळेल. नोकरी लागेल. शुभ दि. , १०

मीन ः रविवार महत्वाचे काम करून घ्या. कार्यक्रम ठरवता येईल. धंद्यात जम बसेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. चंद्र, गुरु लाभयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी सर्वच ठिकाणी वाद होईल. संसारात, भागिदारीत तणाव होईल. राजकीयसामाजिक कार्यात योजनांचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमचे नाव सर्वांमध्ये घेतील. अधिकार मिळेल. नोकरीची समस्या सुटेल. कलाक्रीडा क्षेत्रात काम मिळेल. सहकारी थोडा दुस्वास करतील. कोर्टाच्या कामात सावधपणे व्यवहार करा. संशोधनात किरकोळ अडचण येईल. धावपळ जास्त करावी लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरच जास्त लक्ष घ्यावे. शुभ दि. १०, ११

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here