राशीभविष्य सोमवार, १४ सप्टेंबर २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष – घरगुती विषयात तणाव होईल. वाटाघाटीचा प्रश्न उपस्थित होईल. धंद्यात लक्ष द्या.

वृषभ – आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यात फायदा होईल.

मिथुन – नोकरीत चांगले वातावरण राहील. कोर्टाच्या कामासंबंधी चर्चा सफल होईल. नवे धोकण ठरवता येईल.

कर्क – गैरसमज दूर झाल्याने उत्साहाचे वातावरण घरात, बाहेर राहील. तुमची प्रतिष्ठा वाढेल.

सिंह – गुप्त कारवायांचा त्रास जाणवेल. धावपळ होईल. प्रवासात नवीन लोकांशी ओळख होईल.

कन्या – तणाव कमी होईल. वाद मिटवता येईल. वरिष्ठांच्या संबंधी चिंता कमी होईल. वरिष्ठांची मर्जी राखा.

तुळ – प्रकृतीकडे लक्ष द्या. महत्त्वाच्या वस्तू नीट सांभाळा. वेगळ्या प्रकारची संधी धंद्यात येईल. वस्तू सांभाळा.

वृश्चिक – धंद्यात काम वाढेल आळस करता येणार नाही. आर्थिक बाजू नीट राहील. ओळख होईल.

धनु – आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा झाल्याने एखादे काम पटकन पूर्ण करता येईल. क्षुल्लक अडचण येईल.

मकर – मान-प्रतिष्ठेचा बाऊ न करता लोकांच्यासाठी कामे करा. सभा गाजेल. तुमचे बोल प्रभावी ठरतील.

कुंभ – धंद्यातील समस्या सोडवण्यास यश मिळेल. एखादी न सापडणारी वस्तू मिळेल. दडपण कमी होईल.

मीन – मनाची एकाग्रता वाढेल. नवे नोकर धंद्यासाठी मिळतील. घर, जमीन घेण्याचे ठरवाल.