राशीभविष्य रविवार, १५ नोव्हेंबर ते शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष ः– रविवार तुमच्या विचारांना गुंता होईल. नको असलेले काम करावे लागेल. दुसर्यांना मदत करण्यात वेळ खर्च होईल. पाहुणे येतील. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. दीपावलीचा उत्साह राहील. मनावर एखाद्या कामाचे दडपण राहील. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. त्यामुळे मनाची द्विधा अवस्था होईल. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू नीट ठेवा. धंद्यात काम मिळेल. चिडचिडेपणा टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत रजा मिळणे कठीण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. संशोधन कार्याला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचा आळस करू नये. फटाके वाजवताना भलते धाडस त्रासदायक ठरेल.
शुभ दि. 1६, 1७

वृषभ ः– रविवार महत्त्वाचे काम करून घ्या. खरेदी करण्यात यश येईल. वस्तू मात्र सांभाळा. दीपावलीची तयारी करता येईल. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. घरातील किरकोळ वाद वाढवू नका. मुलांच्या मनाप्रमाणे खर्च करावा लागेल. धंदा मिळेल. गिर्हाईकाबरोबर नीट बोला. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा मान राखून मत व्यक्त करा. चूक होऊ शकते. नोकरीत काम वाढेल. खाण्यापिण्याची वेळ नीट सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होतील. राहण्याची वेळ येऊ शकते. संशोधनात कटकटी होऊ शकतात. दिवाळी पाडवा, भाऊबीज आनंदात साजरी होईल. मंगळवार, बुधवार फटाके सावधपणे वाजवा.
शुभ दि. 1८,1९

मिथुन ः– रविवार मनाप्रमाणे कार्यक्रम ठरवता येईल. खरेदी करण्याचा उत्साह राहील. दीपावलीची तयारी यथासांग करून ठेवता येईल. कुंभेत मंगळ प्रवेश, सूर्य नेपच्यून लाभयोग होत आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनात एकाग्रता होईल. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी किरकोळ अडचण येईल. वस्तू घेण्यास विसराल. लक्षपूर्वक काम करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांची कामे करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. धंद्यात कडवट शब्द वापरू नका. काम मिळेल. नवीन ओळख होईल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. नोकरीचा प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गाला यश येईल. नियमितता ठेवावी. शुभ दि. 15,17

कर्क ः– रविवार तुम्ही ठरविलेला कार्यक्रम सर्वांना आवडेल. मनाप्रमाणे खाण्याचे पदार्थ मिळतील. खरेदी कराल. उत्साह वाढेल. वेगाने काम होईल. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र शुक्र युति होत आहे. धंद्यात ओळखी वाढतील. थोरा-मोठ्यांच्यामुळे मोठे कंत्राट मिळेल. कामगारांना खूश ठेवता येईल. थकबाकी वसूल करा. दिवाळी पाडव्याच्या दिवशी नव्या कार्याचा आरंभ करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. लोकांच्या उपयोगी पडल्याने तुमची लोकप्रियता वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष यश येईल. संशोधनात सुधारणा होईल. वरिष्ठ खूश होऊन तुमची बाजू मांडतील. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. शुभ दि. 18,19

सिंह ः– रविवार तुम्ही ठरविलेल्या कामात यश येईल. धंद्यात वाढ होईल. दीपावलीची तयारी मनाप्रमाणे करू शकाल. उत्साह राहील. कुंभेत मंगळ प्रवेश, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. आप्तेष्ठांच्या समवेत दीपावली साजरी करू शकाल. पाडवा, भाऊबीज यादिवशी दगदग होईल. प्रवासात अडचणी येतील. राजकीय-सामाजिक कार्यातील निर्णय चांगल्या प्रकारे घेता येईल. लोकांपर्यंत पोहचता येईल. धंद्यात चांगले काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. संशोधनाच्या कामात प्रसिद्धी मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. संशोधनाच्या कामात प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाला नव्या विषयाचा अभ्यास करता येईल. फटाके वाजवताना मुलांनी सावध रहावे. शुभ दि. 16,17

कन्या ः- रविवार दिवाळीच्या सणाची तयारी व्यवस्थित पूर्ण करता येईल. मौल्यवान वस्तुंची खरेदी कराल. भेट यशस्वी होईल. कुंभ राशीत मंगळ प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी नव्या व्यवसायाचा आरंभ करता येईल. शुभ समाचार मिळेल. अविवाहितांना चांगली स्थळे येतील. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची चर्चा करता येईल. योजना मार्गी लावा. लोकांच्या समस्या सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीत बदल करू शकाल. धंद्यात मोठे काम मिळवा. संशोधन कार्यात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला पुढे जाता येईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. शुभ दि. 1७,1८

तूळ ः– रविवार तुमचे मन अस्थिर राहील. तुमचा कामाचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. किरकोळ तणाव व नाराजी घरात होईल. कुंभेत मंगळाचे राश्यांतर, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. मंगळवारपासून दिवाळीचा आनंद मनसोक्त घेता येईल. कुटुंबात वादाला जास्त महत्त्व देऊ नका. दिवाळी पाडव्याला नव्या कार्याचा आरंभ करता येईल. नातलागांच्या भेटीने उत्साह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे काम मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखी होेतील. संशोधनाच्या कामात सुधारणा होईल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीकडे वाटचाल करता येईल. घर, जमीन खरेदीचा विचार कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 1८, 1९

वृश्चिक ः- रविवार तुम्ही उत्साहाने काम करून घ्याल. कुठल्याही कामात अहंकारी भाषा वापरू नका. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. धंद्यात आळस करू नका. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र गुरू युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या निर्णयाला विरोध दर्शवला जाईल. लोकांचा विश्वास संपादन करणे कठिण राहील. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन या दिवशी कामाचा गोंधळ होऊ शकतो. गुरुवारपासून मनावरील ताण कमी होईल. धंदा वाढेल. संशोधनात कष्ट घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. फटाके वाजवताना बेफीकीरी वृत्ती त्रासदायक ठरेल. स्वतःच्या वस्तू सांभाळा.
शुभ दि. 15, 16

धनु ः– रविवार दिवाळीसाठी तयारी मनाप्रमाणे करता येईल. धंद्यात फायदा होईल. घरातील लोकांची मदत घेता येईल. कुंभ राशीत मंगळ प्रवेश, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम राजकीय-सामाजिक कार्यात करा. चर्चा सफल होईल. धंद्यात दुर्लक्ष करून चालणार नाही. गिर्हाईकांबरोबर प्रेमाने बोला. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. गुरुवार, शुक्रवार मुलांनी फटाके वाजवताना काळजी घ्यावी. संशोधनात जिद्दीने यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 1६, 1७

मकर ः– रविवार तुमच्या कार्याला गती मिळेल. वाद कमी होईल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. दीपावलीची तयारी चांगली करता येईल. कुंभ राशीत मंगळ प्रवेश, चंद्र, शुक्र युति होत आहे. जीवनसाथी, मुले यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्याल. राजकीय-सामाजिक कार्यात उत्साह राहील. थोरा-मोठ्यांबरोबर चर्चा सफल होईल. मैत्री वाढेल. डावपेच टाकता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. थकबाकी वसूल करा. मोठे कंत्राट मिळवा. विद्यार्थी वर्गाला पुढे जाता येईल. संशोधन कार्यात प्रगती होईल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 1७, 1८

कुंभ ः– रविवार घाई गडबड करू नका. दुखापत होऊ शकते. प्रवासात सावध रहा. खरेदी करताना हिशोबात गोंधळ होऊ शकतो. तुमच्याच राशीत मंगळ प्रवेश, सूर्य नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. मंगळवारपासून सर्व वातावरण आनंदी होईल. दिवाळी पाडवा मनाप्रमाणे साजरा करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. प्रयत्न करा. लोकांच्या समस्या सोडवा. नेमेपणाचा फायदा लोकांना होईल, असे काम करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पुरस्कार मिळेल. धंद्यात मोठा बदल होऊ शकतो. संशोधनात योग्य धागा हाती लागेल. वरिष्ठ खूश होतील. नोकरीत चांगला बदल करू शकाल. विद्यार्थी प्रगती करतील. शुभ दि. 1७,1९

मीन ः– रविवार महत्त्वाचा निर्णय घ्या. दिवाळीची तयारी चांगली होईल. घाई करू नका. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मंगळवार, बुधवार अडचणी वाढतील. राग वाढेल. मारामारीसारखे प्रकरण होऊ शकते. संयमानेच प्रश्न सुटेल. घरात मनमानी चालणार नाही. धंद्यात व्यवहारिक धोरण ठेवावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात वादविवाद होईल. तडजोड करावी लागेल. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी मन स्थिर राहील. पैशाची गुंतवणूक करताना घाई करू नका. संशोधन क्षेत्रात मेहनत जास्त होईल. सहकारी वर्गाशी मैत्रीपूर्ण वागा. शुभ दि. 1५, 1८