हिंगाचे जबरदस्त फायदे

benefits of asafoetida
हिंगाचे जबरदस्त फायदे

बारमाही असलेली औषधी वनस्पती म्हणजे हिंग. हिंग जरी मसालाच्या पदार्थ असला तरी तो प्रत्येकाचा घरात पदार्थाची चव वाढवण्यासाठी असतोच. कोणत्याही पदार्थात हिंग घातल्यामुळे खमंगपणा वाढतो आणि पदार्थाचा सुवास सर्वत्र पसरतो. हिंग खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. त्यामुळे आज आपण हिंगाचे काय फायदे असतात हे जाणून घेणार आहोत.

हिंगाचे फायदे

हिंगात पाणी मिसळून ते मिश्रण जर गुडघ्यावर लावले तर गुडघेदुखी कमी होते.

तसेच पाण्यात हिंग टाकून त्या पाण्याने चुळ भरल्यास दातदुखी थांबते.

शरीरात सारखेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम हिंग करते.

पोटदुखीच्या वेळी जर हिंग पाण्यात मिसळून लावलातर पोटीदुखी नाहीशी होते.

तसेच भाजलेला हिंग आणि मध खाल्ल्यावर देखील पोटदुखील कमी होते.

मधुमेहच्या व्यक्तीने पाण्यासोबत हिंगाचे सेवन केल्याने खूप फायदा होतो.

डोकेदुखीचा त्रास होत असले तर हिंग पाण्यात टाकून त्याचा लेप कपाळावर लावल्यास आराम मिळतो.

लहान मुलांच्या पोटातले जंत नाहीसे करण्यासाठी हिंगाचे पाणी प्यायला द्यायचे.

हाडांच्या बळकटीसाठी देखील हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे.

हिंग हा पाचक असतो त्याचा वापर स्वयंपाकात जरुर केला पाहिजे. पण हिंग गरम असल्यामुळे त्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात देखील केला पाहिजे.