घरलाईफस्टाईलजाणून घ्या 'फेसयोगा'बद्दल...

जाणून घ्या ‘फेसयोगा’बद्दल…

Subscribe

नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्याला उत्कृष्ट सौंदर्य देण्याकरता सध्या फेसयोगाचे नाव घेतले जाते. परदेशातून आलेला हा व्यायाम प्रकार आहे

फेसयोगा ही संकल्पना आपल्याकडे फारशी माहित नाही. मात्र त्याचे फायदे जाणून घेतल्यावर ही संकल्पना जास्तीत जास्त लोकं फॉलो करतील यात शंका नाही. मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि कमीत कमी वेळात सहज-सोपा करता येणारा हा व्यायाम प्रकार आहे. सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिलावर्ग कोणतेही उपाय करताना कित्येकदा दिसतात. नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्याला उत्कृष्ट सौंदर्य देण्याकरता सध्या फेसयोगाचे नाव घेतले जाते. परदेशातून आलेला हा व्यायाम प्रकार आहे. योगाभ्यासात विविध अवयवांसाठी आसने सांगितले आहे. पण त्यातील शरिराच्या मनाने चेहऱ्यावर आधारित कोणता विशेष योगा नाही. मात्र या फेसयोगामुळे ही उणीव भरून निघाली आहे. फेस योगा केल्याने चेहराचा भाग प्रसन्न ठेवणे सहज शक्य होते.

फेसयोगाचे फायदे

  • फेसयोगा केल्याने स्त्रियांच्या संबंधित असणारे थायरॉइड सारखे काही आजार यावर फायदेशीर ठरू शकतात. यासह चेहऱ्यावरील तेज, चमक कायम राखण्यात फेसयोगाचे योगदान महत्वपूर्ण आहे.
  • फेसयोगा करायला दिवसांतील १० ते १५ मिनिटे देखील पुरेशी ठरतात. दिवसात दोन ते तीन टप्प्यात तुम्ही हा फेसयोगा करू शकतात.
  • फेसयोगा हा पोटाच्या स्नायूंशी संबधित नसल्याने इतर योगासनांसारखे फेसयोगा करताना खाण्या-पिण्याचे बंधन नसतात. हा व्यायामप्रकार अगदी कोणत्याही ठिकाणी करता येण्यासारखा आहे.
  • फेसयोगामुळे स्नायुंना चांगलीच बळकटी मिळते, आंकुचन-प्रसरण होऊन रक्ताभिसरण वाढून प्राणशक्ती निर्माण होते. चेहऱ्यावरील चकाकी आणि टोनिंग होण्याची प्रक्रिया फेसयोगामुळे सुरू होते.
  • शरीराप्रमाणेच चेहरा निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी बरेच योगासनं केले जातात. मात्र फेसयोगामुळेचेहऱ्यावर चमकच नाही तर सुरकुत्या आणि मुरुमांसारख्या बर्‍याच समस्या दूर होतात. हा व्यायामप्रकार नियमित केल्याने चेहरा कायम तरूण होण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -