घरलाईफस्टाईलसौंदर्यासाठी लाभदायक मुलतानी माती

सौंदर्यासाठी लाभदायक मुलतानी माती

Subscribe

मातीचे त्वचेच्या प्रकारानुसार मातीचे सौंदर्यविषयक असे आहेत फायदे...

मुलतानी माती सौंदर्याकरिता फायद्याची असल्याने अनेक वर्षापासून तिचा वापर सौंदर्यासाठी करण्यात येतो. हल्ली बाजारात पावडर देखील मिळते ती माती फेसपॅकसारखी चेहऱ्यावर लावता येते. या मातीत असणाऱ्या घटकामुळे त्वचेवरील पुटकुळ्यामुळे पडलेले डाग तसेच वांग कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेचा तेलकटपणा कमी करायला देखील उपयुक्त ठरते. हि माती फिकट पिवळसर रंगांची असते. या मातीचे त्वचेच्या प्रकारानुसार मातीचे सौंदर्यविषयक असे आहेत फायदे…

त्वचेचा तेलकट दूर करण्यासाठी

ज्यांची त्वचा तेलकट आहे या त्यांच्यासाठी मुलतानी माती ही वरदान आहे. या प्रकारची त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती गुलाबपाणी, तुळशीची पाने किंवा रस गुलाबपाणी आणि एक चिमटी हळद हे एकत्र करून त्यात पेस्ट होईल इतकं पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि वाळल्यानंतर लगेच धुवून टाकावे. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्याला नवीन तजेला मिळतो. हा पाक १५ दिवसातून एकदा लावावा.

- Advertisement -

त्वचेवरील डागांकरिता

अनेकदा पुटकुळ्या येऊन गेल्यावर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात आणि हे डाग सौंदयमध्ये बाधा आणतात अश्यावेळी मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचं रस चंदन पावडर मिक्स करावे आणि पॅक तयार करावा आणि चेहऱ्याला लावावा.त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल.

पुटकुळ्या आणि काळी वर्तुळे

तारुण्यपिटिका येत असतील तर पोटात औषधे घेणे आवश्यक असते. तसेच अशा त्वचेसाठी आणि पुटकुळ्यासाठी या मातीत कडूनिंब रस किंवा पावडर घालवे तसेच गुलाबपाणी घालावे आणि हा पॅक चेहऱ्यावर लावावा. मानसिक ताणामुळे डोळ्याखाली वर्तुळे आल्यास या मातीमध्ये दही पुदिना आणि गुलाबपाणी घालून गालावर डोळ्यांपासून लांब पण डोळ्यांजवळ हा पॅक लावावा.

कोरड्या त्वचेसाठी

या मातीमध्ये बदाम आणि दुधाचे प्रमाण जास्त घालावे तसचे दूध ऐवजी साय घातल्यास उत्तम तसेच एक चिमूट चंदन पावडर घालावी यामुळे त्वचेतील रुक्षता कमी होऊन त्वचा तुकतुकीत होईल.

कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी

कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी या मातीत दूध आणि बदामाची थोडी पूड किंवा बदाम उगाळून मातीत मिक्स करून पॅक करावा. या प्रकारच्या पॅकमुळे दूध आणि बदामामुळे त्वचेतील स्निग्धता राखली जाते आणि मुलतानी मातीमुळे त्वचा तेलकट होत नाही दोन्ही गोष्टींचा समतोल राखला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -