घरलाईफस्टाईलसाड्यांमधील कॉर्पोरेट लूक

साड्यांमधील कॉर्पोरेट लूक

Subscribe

आतापर्यंत केवळ लग्नसमारंभापुरत्या मर्यादित असलेला साडी हा पोषाख हळुहळू कॉर्पोरेट जगतातसुद्धा महिलांचे आकर्षण बिंदू ठरत आहे. नेहमीच्या ट्रॉऊझर्स, शर्ट्ससारख्या त्याच त्याच फॉर्मल कपड्यांना कंटाळला असाल तर कार्यालयीन पोशाखात साड्यांचा पर्याय निवडा. त्यामुळे नेहमीच्या ऑफिस लूकपासून सुटका होईलच. शिवाय कार्यालयातील इतर स्टाफमध्ये तुम्ही हटके दिसाल. परिणामी तुमचा आत्मविश्वासही दुणावेल. त्यामुळे कॉर्पोरेट लूकसाठी कोणत्या साड्या निवडता येतील त्याविषयी थोडक्यात.

हातमागावरील साड्या – हातमागावरील साड्या या विणलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या रंगात, डिझाइनमध्ये त्या सहज उपलब्ध होतात. पाना-वेलींचे तसेच वारली नक्षीकाम किंवा स्वतःच्या आवडीच्या नक्षीकामात साड्या विणून घेता येतात.

- Advertisement -

सिल्क साडी – हा साडीप्रकार सर्वच वयोगटातील महिलांवर खुलून दिसतो. ऑफिस मिटींग्समध्ये प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सिल्क साड्यांचा पर्याय निवडता येऊ शकतो.

शिफॉन साडी – वजनाने हलकी असणारी शिफॉन साडी मुलींच्या अगदीच जिव्हाळ्याची. ऑफिस अटायरसाठी शिफॉन साडी निवडल्यास त्यावर हलकासा मेकअप केल्यास छान कॉर्पोरेट लूक येतो.

- Advertisement -

कॉटन साडी – जवळपास सर्वच महिलांचा आवडता साडी प्रकार म्हणजे कॉटन साडी. या साडी प्रकारात कम्फर्टेबल राहता येत असल्याने कार्यालयीन पोषाखात महिला या साडीप्रकाराचा हमखास विचार करू शकतात. त्यातच हलक्या प्रिंटची कॉटन साडी आपल्याला एक वेगळा लूक देऊन जाते. कॉटन साडीवर जंक ज्वेलरी आणि साजेसा मेकअप आपल्याला सर्वांपेक्षा ‘कुल लूक’ देतो. फिक्या रंगाच्या कॉटन साड्या हादेखील उत्तम पर्याय आहे.

लिनन साडी – ऑफिसला जाणार्‍या मुलींसाठी लिनन साडी प्रकार हा सर्वात कंफर्टेबल असा पर्याय आहे. साध्या तागापासून बनवलेल्या या साड्या आपला ऑफिस लूक अधिक आकर्षक बनवतात. या साड्यांवर आपण वेगवेगळे डिझाईनर ब्लाऊज परिधान करण्याचे प्रयोगदेखील करू शकतो. कारण लिनन साडी असा पॅटर्न आहे, जे आपण कोणत्याही ओकेजनवर अगदी बिनधास्तपणे परिधान करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -