घरलाईफस्टाईलग्रीन चकली

ग्रीन चकली

Subscribe

साहित्य-

* ४ वाट्या चकलीची भाजणी,
* २ वाट्या पालकाची बारीक केलेली पेस्ट(पालक कच्चाच वापरणे),
* १ टेबलस्पून तीळ,
* २ चमचे हिरव्या मिरच्यांचा ठेचा
* अर्धा चमचा हिंग,
* १ चमचा ओवा,
* मोहनासाठी तेल अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी,
* चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल, २ वाट्यांपेक्षा थोडे कमी पाणी.

कृती –

* प्रथम पाणी व पालक पेस्ट उकळत ठेवावी.
*त्यात तेल, हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालावा. पिठात मीठ, ओवा, तीळ, हिंग घालून मिसळावे.
*पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे आणि झाकण ठेवावे.
* गॅस बंद करून थोड्या वेळाने त्याला तेल-पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे.
*चकलीच्या सोर्‍यामध्ये पिठाचा गोळा घालून चकल्या मंद गॅसवर तळून घ्याव्यात. या चकल्यांना छान हिरवा रंग येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -