घरताज्या घडामोडीचामखीळ घालवण्यासाठी करा घरगुती उपाय

चामखीळ घालवण्यासाठी करा घरगुती उपाय

Subscribe

अनेकांच्या शरीराच्या कुठल्याही भागावर चामखीळ असतात. त्यामुळे अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. चामखीळ मोठे असल्यामुळे काही लोकांना ते आवडत देखील नाही. त्यामुळे चामखीळ काढण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करतात. पण काही वेळा असे प्रयत्न करूनही चामखीळ जात नाही. त्यामुळे आज आपण चामखीळवर घरगुती उपाय काय करता येऊ शकतो ते जाणून घेणार आहोत.

सफरचंदाचे व्हिनेगर

- Advertisement -

सफरचंदाचे व्हिनेगर चामखीळच्या मुळाशी लावणे फायदेशीर असते. दिवसातून तीन वेळा सफरचंदाचे व्हिनेगर कापसावर घेऊन चामखीळवर लावत जा आणि त्यानंतर ती कापसानेच झाका. हा उपाय काही दिवस नियमित केल्याने चामखीळ हळूहळू गळून पडते.

केळ्याचे साल

- Advertisement -

केळ्याच्या सालीचे अनेक गुणधर्म आहेत. त्यातला एक हा गुणधर्म. केळ्याच्या सालीचा वापर आपण चामखीळ घालवण्यासाठी करू शकतो. त्यासाठी केळ्याचे साल चामखीळच्या ठिकाणी एका कापडाच्या सहाय्याने बांधून रात्रभर ठेवून द्यावे. हा उपाय काही दिवस केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.

लसूण

चामखीळ काढण्यासाठी लसूण खूप उपयोग ठरते. लसणामध्ये अॅटीबॅक्टेरियल आणि अॅटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे चामखीळ काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यासाठी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट एक तास चामखीळवर ठेवावी. त्यानंतर थंड पाण्याने ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. असे दिवसातून दोन वेळा करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -