घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: सेक्स दरम्यान ही काळजी घ्या आणि कोरोनाचा धोका टाळा

Coronavirus: सेक्स दरम्यान ही काळजी घ्या आणि कोरोनाचा धोका टाळा

Subscribe

कोरोना विषाणूने जगाला कवेत घेऊन आता नऊ महिन्यांचा काळ लोटला आहे. रशियाने काल कोरोना विरोधातली लस शोधल्याचा दावा केला. जगभरात रोजच कोरोना नामक विषाणूमुळे हजारो रुग्ण बळी पडत आहेत. कोरोना आणि इम्युनिटी यावर अनेक चर्चा झाल्या आहेत. कोरोनाकाळात सेक्स करणे योग्य आहे का? काय काळजी घेतली पाहीजे? यावर फारशी चर्चा झाली नव्हती. मात्र आता प्रणयसंबंधावर माहिती देणाऱ्या सेक्शुअल हेल्थ चॅरीटी या संस्थेने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचना अमलात आणल्यास सेक्स दरम्यान कोरोनाचा धोका टाळला जाऊ शकता.

युके मधील टेरेंस हिगिंस ट्रस्ट (The Terrence Higgins Trust – THT) ही संस्था एड्स आणि लैंगिक मदतीबाबत (HIV and sexual health charity) काम करते. कोरोनामुळे लोकांना लैंगिक संबंधापासून अधिक काळ दूर ठेवता येणार नाही. मात्र काही खबरदारीचे उपाय राबवून यातून मार्ग काढला जाऊ शकतो. यासंस्थेने सांगितल्या प्रमाणे, लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना तुम्हाला मास्क घालणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर तुम्हाला ओठांचा ओठांनी स्पर्श देखील टाळावा लागेल. डेलीमेल युके या संकेतस्थळाने ही बातमी दिली आहे.

- Advertisement -

युकेमध्ये केलेल्या एका सर्वेनुसार या संस्थेने काही निरीक्षणे नोंदविली आहेत. मार्चमध्ये जवळपास सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांनी नव्याने पार्टनर शोधणे थांबवले होते. कोरोनाच्या भीतीमुळे घरात देखील आपल्या लाईफ पार्टनर सोबत लैंगिक संबंध ठेवण्यास अनेक लोक घाबरत होते. मात्र यापुढे तुम्ही खबरदारी घेऊन असे सबंधं प्रस्थापित करु शकता, असे संस्थेचे म्हणणे आहे.

guidelines to avoid covid
मार्गदर्शक सूचना

मार्गदर्शक सूचना करत असताना टेरेंस हिगिंस ट्रस्टने एक इशारा देखील दिलाय. जर तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नी सोबत संबंध ठेवत असाल तरच ते योग्य राहिल. जर तुम्ही बाहेरील व्यक्तिसोबत लैंगिक संबंध ठेवत असाल तर तुम्हाला निश्चितच धोका आहे. अशा वेळी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे. जर शारिरीकदृष्ट्या तुम्हाला स्वतःला अस्वस्थ वाटत असेल तर अशा वेळी शारिरीक संबंध न ठेवणेच बरे. कोरोना विषाणूची लक्षणे दिसत असेल तर आपल्या पार्टनरपासून लांबच राहिलेले उत्तम ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -