घरलाईफस्टाईलघामोळे न येण्यासाठी करा 'हे' उपाय

घामोळे न येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

अति उष्ण आणि दमट वातावरणात राहाणाऱ्या लोकांना घामोळ्यांचा त्रास अधिक जाणवतो

उन्हाळा आला की घाम येण्याबरोबर सर्वांना एक त्रास होतो तो पुरळाचा. लहान असो किंवा मोठे अगदी लहान बाळालाही उष्णतेमुळे बहुतेकदा उन्हाळ्यात पुरळ येते. त्वचेशी निगडीत काही त्रासांना एकत्रितपणे घामामुळे येणाऱ्यांना घामोळ्या असे म्हटले जाते. अति उष्ण आणि दमट वातावरणात राहाणाऱ्या लोकांना घामोळ्यांचा त्रास अधिक जाणवतो. अशा वातावरणात राहिल्याने खूप जास्त घाम येतो त्यामुळे घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि त्यामुळे घामोळ्या येतात.

घामोळ्या सर्वसाधारणपणे मानेवर तोंडावर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर, कपाळावर आलेल्या दिसून येतात.

- Advertisement -

घामोळे न येण्यासाठी करा हे उपाय-

  • मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.
  • थंड वातावरणात राहाण्याचा प्रयत्न करावा किंवा वातानुकुलित वातावरणात रहावे. घामोळ्यांमुळे येणारी खाज कमी क़रण्यासाठी दिवसातून दोन तीन वेळा गार पाण्याने अंघोळ करावी.
  • उन्हाळ्यात सैलसर, सुती कपडे परिधान करावे आणि कृत्रिम धाग्याचे कपडे वापरु नयेत. जेणेकरुन हवा खेळती राहते
  • भरपूर पाणी प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच रसदार फळे खावीत.
  • कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
  • घामोळ्यांवर कोणतेही क्रीम किंवा तेल लावू नये त्यामुळे घर्मछिद्रे बंद होतील आणि समस्या आणखी वाढेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -