घरलाईफस्टाईलवय कमी असताना का होतात पांढरे केस; ही आहेत कारणं

वय कमी असताना का होतात पांढरे केस; ही आहेत कारणं

Subscribe

सध्याच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांचे केस देखील पांढरे होतातसध्याच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांचे केस देखील पांढरे होतात

आजकाल वय कमी असलं तरी केस पांढरे होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पुर्वीच्या काळात एक ठराविक वयोमर्यादा ठरलेली असायची त्या वयातच केस पांढरे व्हायचे. परंतु, सध्याच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांचे केस देखील पांढरे होतात. या समस्येला अनुवंशिक मानले जाते. पण, इतर दुसरे कारणं देखील आहेत. कोणती आहेत त्याची कारणं जाणून घेऊया..

- Advertisement -

प्रदुषण

हवेतील बदलामुळे केसांना नुकसान पोहचते. हवेत असणारे प्रदूषणातील घटकामुळे केस लवकरात लवकर पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात. प्रदूषणातील घटकामुळे रेडिकल्स मेलानिनला नुकसान पोहचवतेच तसेच, केसांना पांढरे करण्याचे काम करते.

ताणतणाव

केस पांढरे होण्यास ताण तणाव हे मुख्य कारण असू शकते. ताण घेतल्याने केसांचा नैसर्गिक रंग नाहीसा होतो. त्यामुळे तणावापासून दूर राहिलेले योग्य ठरेल.

- Advertisement -

धुम्रपान

धुम्रपान केल्याने देखील केस पांढरे होऊ शकते. जे लोकं धुम्रपान करतात त्यांचे केस कमी काळात पांढरे होतात. याशिवाय धुम्रपानाच्या नियमित सेवनाने गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.

हार्मोन

शरिरातील हार्मोनची पातळी बिघडल्याने देखील केस पांढरे होण्याची शक्यता असते. हार्मोनचे संतुलन बिघडल्याने केसांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे केसांचे सौंदर्य नष्ट होऊन केस गळण्याची समस्या निर्माण होते.

अनहेल्दी डाइट

आहाराचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय आहारतील न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेमुळे देखील केस पांढरे होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -