स्वयंपाक घरातील महत्त्वाच्या टीप्स

स्वयंपाकासाठी काही खास टिप्स

Mumbai
kitchen tips in marathi
स्वयंपाक घरातील टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

 • भजीच्या पीठामध्ये मक्याचे पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात.
 • शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघतात.
 • पालेभाज्या सुकल्यावर पाण्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात.
 • कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.
 • फळभाज्या मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिळाच्या पाण्यात घालून ठेवल्याने टवटवीत राहण्यास मदत होते.
 • कडुनिंब शिल्लक असल्यास तो तळून डब्यात भरुन ठेवल्याने जास्त काळ टिकतो.
 • लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.
 • पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.
 • भेंडीची भाजी करताना त्यात दही घातल्याने भाजी चिकट होत नाही.
 • भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले मीठ टिकून राहते.
 • डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.
 • तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.
 • तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.
 • जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते सहा मिनिटे लिंबू कोमट पाण्याच भिजवावे.
 • सुकं खोबरं तुरडाळीच ठेवले तर खराब होत नाही.