घरलाईफस्टाईलसेल्फी लवर्स सावधान ! वाढतोय "सेल्फी डिसमॉर्फिया”

सेल्फी लवर्स सावधान ! वाढतोय “सेल्फी डिसमॉर्फिया”

Subscribe

परफेक्ट सेल्फीसाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे, असं भारतातील एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. याला 'सेल्फी डिसमॉर्फिया' असं म्हणतात आणि ही खूप चिंतेची बाब आहे.

प्रत्येकालाच सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची हौस असते. पण, आपला सेल्फी चांगला येत नाही त्यामुळे सेल्फी फिल्टर करुन पोस्ट केला जातो. यामुळे मनावर ताण येतो, आत्मविश्वास खचतो, शरीर प्रतिमेबाबत नकारात्मकता निर्माण होते. या सर्वामुळे परफेक्ट सेल्फीसाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे, असं भारतातील एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. याला ‘सेल्फी डिसमॉर्फिया’ असं म्हणतात आणि ही खूप चिंतेची बाब आहे. एस्थेटिक क्लिनिक्स या कॉस्मेटिक सर्जरी आणि स्किनकेअर विभागातील भारतातील प्रख्यात क्लिनिक्सने हा अभ्यास केला. एस्थेटिक क्लिनिक्सने त्यांच्या कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शाखांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीसाठी येणाऱ्या ३०० रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

परफेक्ट सेल्फीसाठी महिला आग्रही

सर्वेक्षणानुसार, परफेक्ट सेल्फी मिळत नाही म्हणून ७४ टक्के स्त्रियांचा आत्मविश्वास खालावलेला असतो आणि त्यांना स्वत:चे रूप बदलण्याची इच्छा असते. तर, पुरुषांमध्ये ६९ टक्के हे सेल्फीमुळे आत्मविश्वास कमी होण्याचे आणि नकारात्मकता येण्याचं प्रमाण असून हे चिंतेचे कारण आहे. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे रूप बदलण्याची इच्छा वाढून पुरुषांमध्ये हे प्रमाण ६२ टक्के, तर स्त्रियांमध्ये ७४ टक्के झाले आहे.

- Advertisement -

याविषयी प्रख्यात फेशिअल प्लास्टिक आणि फेशिअल कॉस्मेटिक सर्जन तसेच एस्थेटिक्स क्लिनिकचे संचालक डॉ. देबराज शोम यांनी सांगितलं की,“चार शहरांमध्ये झालेला हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. सेल्फी काढणे, त्यात बदल करणे आणि सोशल मीडियावर त्या पोस्ट करणे याचा आत्मविश्वास आणि शरीर प्रतिमा धारणेवर नकारात्मक परिणाम होतो, तसेच यामुळे बॉडी डिसमॉर्फियाला चालना मिळते असे या अभ्यासातून दिसून आले आहे. सेल्फी रिटच आणि रिटेक करण्याची संधी मिळालेल्यांमध्येही हे घातक परिणाम दिसून आले. सेल्फी काढण्याच्या व ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या कृतीमुळे आपल्या दिसण्याबद्दल लक्षणीय अशी अपूर्णत्वाची भावना निर्माण होते आणि कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्रक्रियांद्वारे चेहऱ्यात बदल करून घेण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते.”

सेल्फी घेणे ही सवय

वारंवार सेल्फी घेत राहणे हा स्वत:चे शरीर सतत तपासत राहण्याचाच प्रकार समजला जाऊ शकतो. पुन्हापुन्हा वजन करत राहणे किंवा सारखी स्वत:ची प्रतिमा आरशात बघत राहणे यांसारखाच हा प्रकार आहे. मुंबईत ६३ टक्के पुरुषांमध्ये तर ७५ टक्के स्त्रियांमध्ये सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट केल्यानंतर मानसिक ताणाची पातळी वाढत असल्याचे दिसून आले, आत्मविश्वास कमी होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये ६९ टक्के, तर स्त्रियांमध्ये ७४ टक्के आढळले. मुंबईतील ७२ टक्के पुरुषांमध्ये, तर ७४ टक्के स्त्रियांमध्ये त्यांच्या रूपाबद्दल असमाधान निर्माण झाल्याचे यात दिसून आले, असंही शोम यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

“ज्यांचा आत्मविश्वास पूर्वीपासूनच कमी आहे आणि समाजाबद्दलची भीती किंवा मानहानीची शक्यता कमी असल्याने ते सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक वर्तनाचा पर्याय स्वीकारतात. सेल्फी घेण्याचे कोणतेही लाभ दिसलेले नाहीत. त्यामुळे मोबाइल फोनमधील फ्रण्ट फेसिंग कॅमेरावर सरकारने बंदी आणावी अशी शिफारस आम्ही करत आहोत. लोकांना सेल्फी घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी मोहीम घेण्याचीही गरज आहे.”- कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट आणि एस्थेटिक क्लिनिक्सच्या सहसंस्थापक, डॉ. रिंकी कपूर

भारत (टक्केवारी)                मुंबई (टक्केवारी)

महिला     पुरुष            महिला      पुरुष

मानसिक ताण वाढणे                                ६५         ६०               ७५        ६३

आत्मविश्वास कमी होणे                             ७०         ६१                ७४        ६९

शारीरिक आकर्षणाची भावना कमी होणे            ६७         ६१               ७४         ७२

कॉस्मेटिक सर्जरी करण्याची इच्छा                    ६५        ६२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -