घरलाईफस्टाईलसकाळचा नाश्ता टाळल्याने होऊ शकतात हे गंभीर दुष्परिणाम

सकाळचा नाश्ता टाळल्याने होऊ शकतात हे गंभीर दुष्परिणाम

Subscribe

कोणत्याही कारणाने सकाळचा नाश्ता टाळणं हे भविष्यात गंभीर आजारांशी सामना करायला लावणारं आहे

तुम्ही सकाळचा नाश्ता करत नाही आणि रात्रीचे जेवण ही उशीरा करता का? आपल्या जेवणाची वेळ योग्य नसेल तर त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. तसेच, हृदयाचे आजार होण्याची शक्यताही असू शकते, असे काही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. सकाळच्या धावपळीत नाष्टा करण्यास वेळ मिळत नाही. तसेच काहींना सकाळी नाश्ता करण्याची सवयच नसते. काही आहारतज्ज्ञांनी सकाळचा आहार आवश्यक असतो, असे म्हटले आहे.

कोणत्याही कारणाने सकाळचा नाश्ता टाळणं हे भविष्यात गंभीर आजारांशी सामना करायला लावणारं आहे. परंतु, सकाळच्या नाश्त्यातून मिळणाऱ्या पोषणमुल्यातून शरिरास ऊर्जा मिळते. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सकाळचा नाश्ता प्रथिनयुक्त असायला हवा. यासोबत दूध, नट्स, पोहे, इडली, उपमा आणि अंडे आहारासाठी लाभदायक ठरू शकतात. नाश्ता न केल्याने होऊ शकतात हे गंभीर परिणाम

- Advertisement -

मधुमेहाचा धोका संभावतो

सकाळचा नाश्ता वेळेत केला नाही किंवा नाश्ता करणं टाळलं तर शरिरातील इन्सुलीन आणि शर्करेचे प्रमाण अनियंत्रित होऊन मधुमेहाचा आजार किंवा धोका संभवण्याची शक्यता वाढते.

वजन वाढू शकते

नियमित नाश्ता करण्याची सवय असणाऱ्यांना वजन वाढण्याची समस्या निर्माण होत नाही. सकाळचा नाश्ता न करता दुपारचे जेवण केल्यास वजन वाढू शकते.

- Advertisement -

हृदयरोगाच्या समस्यांचा धोका

सकाळी पौष्टीक नाश्ता नियमित केल्यास हृदय विकार किंवा हृदयासंबधी आजारापासून धोका निर्माण होत नाही. परंतु नाश्ता केला नाही तर ताणतणावाच्या समस्या, रक्तातील शर्करा वाढण्याचा धोका वाढू शकतो.

अॅसिडिटी होते

रात्रभर उपाशी राहिल्यामुळे त्यामध्ये एसिड्सचे प्रमाण वाढते. अॅसिड्स जेवण पचन करण्याचे काम करते. ज्यावेळी पोटात काही नसते तेव्हा ते अॅसिडिटी वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -