शरीराचा बांधा सुडौल करण्यासाठी मदत करणारी ‘ही’ आहे एकमेव प्रक्रिया

कूल स्कल्प्टिंग आणि लायपोसक्शन यांसारख्या शरीरातील चरबी काढून घेणाऱ्या असंख्य उपचारपद्धती उपलब्ध आहेत. मात्र एनस्कल्प्ट ही प्रक्रिया शरीरातील चरबी काढतेच,त्याचबरोबर शरीरातील स्नायू बळकट करण्यात मदत करते व दीर्घकाळ टिकणारे आणि अधिक चांगले परिणाम देत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Mumbai
body shape
प्रातिनिधिक फोटो

एमस्कल्प्ट ही सर्वांना आपल्याला हवा तसा बांधा घडवण्यात मदत करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्वांत क्रांतीकारी उपचारपद्धती आहे यात वादच नाही. कूल स्कल्प्टिंग आणि लायपोसक्शन यांसारख्या शरीरातील चरबी काढून घेणाऱ्या असंख्य उपचारपद्धती उपलब्ध आहेत. मात्र एनस्कल्प्ट ही प्रक्रिया शरीरातील चरबी काढतेच,त्याचबरोबर शरीरातील स्नायू बळकट करण्यात मदत करते व दीर्घकाळ टिकणारे आणि अधिक चांगले परिणाम देते. एमस्कल्प्ट ही तुलनेने नवीन प्रक्रिया (केवळ दोन वर्षांपूर्वीची) आहे पण ती सर्व प्रकारच्या शारीरिक बांध्यांसाठी उत्तम परिणाम देत आहे. विद्युतचुंबकीय लहरींमधील ऊर्जेचा वापर करून स्नायूतील उतींमध्ये जलद गतीने सुप्रामॅक्झिमल आकुंचनांना चालना देण्याच्या तत्त्वावर एमस्कल्प्ट ही प्रक्रिया आधारित आहे. ही आकुंचने जिममध्ये वजने उचलताना होणाऱ्या स्नायूंच्या ऐच्छिक कृतींमुळे होतात तशीच असतात पण त्याहून खूप अधिक परिणामकारक असतात.

काय आहे डॉक्टरांचे मत

मुंबईतील एस्थेटिक क्लिनिकमधील सेलेब्रिटी फेशिअल प्लास्टिक सर्जन व कॉस्मेटिक सर्जन डॉ. देबराज शोमम्हणाले, “एमस्कल्प्ट उच्च तीव्रतेच्या विद्युतचुंबकीय लहरींचा (एचआयएईएम) वापर करते. या प्रक्रियेत अप्लिकेटर्सच्या दोन पॅनल्समधून लहरींचे प्रक्षेपण केले जाते. हे मशिन ३० मिनिटांत सुमारे २०००० आकुंचनांची मालिका निर्माण करते. या आकुंचनांमध्ये शरीरातील चरबीच्या चयापचयाला उत्तेजन देण्यासाठी पुरेशी शक्ती असते. हा चरबीयुक्त पेशींच्या विभाजनासाठी निदर्शक ठरतो आणि शरीरात फॅटी अॅसिड्स (चरबीयुक्त आम्ले) मुक्त सोडली जातात. या आकुंचनांमुळे मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिड्स मुक्त होतात आणि चरबीयुक्त पेशी नष्ट होतात. या पेशींचे अवशेष नैसर्गिक क्रियांद्वारे शरीराबाहेर टाकले जातात.

“एमस्कल्प्ट शरीराच्या विविध अवयवांवर वेगवेगळा परिणाम करते. उदाहरणार्थ, ओटीपोट, जांघेचा प्रदेश, त्रिशिर (ट्रायसेप्स) आणि नितंब या अवयवांवर या प्रक्रियेचा वेगवेगळा परिणाम होतो. या आकुंचनांची तीव्रता डॉक्टर नियंत्रित करतात. त्याचप्रमाणे रुग्णाच्या सहनशक्तीवरही ते अवलंबून असते. तीस मिनिटांच्या सत्राच्या अखेरीस, डॉक्टर ही आकुंचने संथ करतात, जेणेकरून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते,” असे डॉ. शोम म्हणाले.

एमस्कल्प्ट ही नॉन-इन्व्हेसिव्ह प्रक्रिया असून रुग्णांना उपचाराचे प्रमाण व कालावधी ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. एमस्कल्प्टचे खालील परिणाम दिसतात:

● त्वचेखालील (सबक्युटान्युअस) चरबीत १९ टक्के घट

● स्नायूंचे वस्तूमान १६ टक्के वाढते

● कमरेच्या घेरात १.५ इंचापर्यंत घट होते

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here