घरलाईफस्टाईलट्रेंडींग बॅग्स

ट्रेंडींग बॅग्स

Subscribe

एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही छान ड्रेस घातलात, मस्त बूट्स घातले, मेकअप केला की आपण तयार झालो असे तुम्हाला वाटत असेल. पण जरा थांबा आणि विचार करा. लूक पूर्ण करायला आणि तुमचे गरजेचे सामान सोबत न्यायला एक छान आणि आकर्षक बॅग तुम्हाला लागेलच! त्यामुळे सध्या ट्रेंडिंग असणार्‍या बॅग्स आम्ही सुचवले आहेत. जाणून घेण्यासाठी पुढे वाचा …

स्लिंग बॅग

छोटीशी दिसणारी ही बॅग, पण गरजेचं सर्व सामान यात पुरतं. या बॅग्सला एक मोठी स्लिंग म्हणजेच पट्टा असतो. हा पट्टा लेदर किंवा मेटलचा सुद्धा असतो. एका खांद्यावर ही बॅग लटकवली की हातात सांभाळायचे ही काम नाही. आकर्षक रंगात या बॅग्स येतात. तुमच्या ड्रेससोबत मॅच होईल असे रंग तुम्ही निवडू शकता. याचा बेल्ट काढून तुम्ही या बॅगला हातात ही घेऊ शकता आणि याची लेन्थ सुध्दा कमी-जास्त करू शकता.

- Advertisement -

हॅन्ड बॅग

या बॅग्स हातात पकडायला आणि साईडला लावायला असतात. या बॅग्सची साईझ खूप मोठी असते जेणेकरून यात खूप सामान बसतं. अगदी बाहेर फिरायला जाताना तुम्ही दोन ते तीन दिवसांचे कपडेही यात भरू शकता. ऑफिसला जाणार्‍या महिलांची आणि आजकाल कॉलेजगर्ल्सनाही ही या प्रकारच्या बॅग्सला खूप मोठी पसंती दिली आहे.

पाठीला लावणारे बॅग्स

या बॅग्स एकदम कन्फर्टेबल असतात. रोजच्या धकाधकीच्या प्रवासात बॅग मागे पाठीला लावली की काम झाले. प्लेन आणि सिम्पल असणार्‍या या बॅग्स आहेत. पण यात आकर्षक रंगसुध्दा आहेत. दिसायला एकदम स्लीक आणि स्टायलीश आणि वापरायला एकदम सॅकसारखे सोईस्कर.

- Advertisement -

मल्टीपर्पज बॅग्स

या बॅग्समध्ये आपण डब्बा, कपडे, रोजचे गरजेचे सामान आणि बरेच काही ठेवू शकतो. जीमला जाताना किंवा, ट्रेकिंगला जाताना किंवा एक शॉर्ट ट्रीप असो हे बॅग्स खूप उपयोगाला येतात.

डब्ब्याची बॅग

रोज आपल्या पर्समध्ये डब्बा घेऊन जाणे, मग तेल गळायची भिती किंवा डब्ब्यासाठी वेगळी प्लॅस्टिक बॅग नेणे. पण या प्लास्टिक बंदीच्या काळात आपण रंगीबेरंगी आणि छान अशा बॅग्सही डब्ब्याला घेऊन जाऊ शकतो. या बॅग्स कलरफूल आणि डब्बा बसेल याच साईज मध्ये असतात. गोल आणि आकर्षक डिजाइन असलेल्या या कॅरीबॅग्स रोज ऑफिसला घेऊन जायला किती छान वाटेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -