घरलाईफस्टाईलपोटाच्या कॅन्सरवर हळद उपयुक्त

पोटाच्या कॅन्सरवर हळद उपयुक्त

Subscribe

हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारं करक्यूमिन पोटाचा कर्करोग म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असते.

धावपळीचे जीवन जगत असताना कोणता आजार कधी कोणाला होईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. अवेळी खाण्या-पिण्याच्या सवयी, पुर्णवेळ झोप न होणे, सतत मोबाईल- लॅपटॉपचा वापर करणे यामुळे नकळत अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. सध्या पोटाचा कॅन्सर हा अनेक वर्षात हळूहळू विकसित होताना दिसतोय. त्यामुळे सुरुवातीला कोणतेही स्पष्ट लक्षण दिसत नाही. परंतु काही सामान्य लक्षणे अशी सांगता येतील.

- Advertisement -

पोटाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणे

  • भूक कमी होणे
  • वजन कमी होणे
  • पोटात वेदना होणे
  • अपचन आणि मळमळ होणे
  • उलटी होणे आणि सोबतच उलटीतून रक्त येणे
  • पोटात सूट येणे
  • विष्ठेतून रक्त येणे

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पाराच्या संशोधकांनी ब्राझीलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारं करक्यूमिन पोटाचा कर्करोग म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असते.

पोटाच्या कॅन्सरची कारणे

हा रोग वाढण्याला तणाव, धुम्रपान आणि अल्कोहोल या गोष्टी जबाबदार असतात. परंतु, धुम्रपानामुळे स्थिती आणखी खराब होते. भारतात अनेक ठिकाणांवर आहारात फायबरचं प्रमाण कमी राहते. अधिक मसालेदार आणि मांसाहारामुळे पोटात सूज येऊ शकते आणि ज्याकडे दुर्लक्ष केलं तर कॅन्सर होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -