घरमहा @२८८अकोट विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २८

अकोट विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८

Subscribe

अकोला जिल्ह्यातील आकोट (विधानसभा क्र. २८) विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोला जिल्ह्यातील आकोट हा क्रमांक २८ वा विधानसभा मतदारसंघ आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघाने १९८५ पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीने पाळला आहे. २०१४ पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. २००९ मध्ये या ठिकाणाहून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र २०१४ मध्ये युती तुटली आणि भाजपच्या तिकीटावर शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील प्रकाश भारसाकळे विजयी झाले.

मतदारसंघ क्रमांक – २८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,४५,६७७

महिला – १,२६,५६६

एकूण मतदार – २,७२,२४३

विद्यमान आमदार – प्रकाश गुणवंतराव भारसाकळे, भाजप

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातून शिवसेनाच्या माध्यमातून प्रकाश भारसाकळे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. सहकार क्षेत्रात आपला दबदबा कायम करत त्यांनी दर्यापूर मतरदार संघातून दोनदा आमदारकी भूषविली. विकास कामांचा धडाका आणि प्रशासनावरील मजबूत पकड या दोन बाबींमुळे जनमानसात आमदार भारसाकळे यांची धडाकेबाज आमदार म्हणून प्रतिमा आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राणेंसह आमदार भारसाकळे यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काँग्रेसमध्ये त्यांचे मन फार जास्त रमले नाही. दर्यापूर मतदार संघ राखीव झाल्यावर त्यांनी अकोट विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे ज्येष्ट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमधअये प्रवेश केल्यावर त्यांना अमरावती जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले.

mla prakash bharsakle
आमदार प्रकाश भारसाकळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रकाश गुणवंतराव भारसाकळे, भाजप – ७०,०८६

२) महेश गणगणे, काँग्रेस – ३८,६७५

३) प्रदीप वानखेडे, भारिप – ३२,३५०

४) संजय गावंडे, शिवसेना – १४,०२४

५) राजीव बोचे, राष्ट्रवादी – ३,२००

हे वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -