घरमहा @२८८अमळनेर विधानसभा मतदारसंघ - म.क्र.१५

अमळनेर विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१५

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (विधानसभा क्र.१५) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो.जळगाव जिल्हयातील सर्वात मोठा तालुका असलेला अमळनेर मतदारसंघ हा बोरी नदीच्या किनार्‍यावर आहे. या मतदारसंघात आजपर्यंत बाहेरून आलेला उमेदवार आमदार झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार उमेदवारपेक्षा त्याने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून मतदान करते असा एकंदरीत समज आहे.

मतदारसंघ क्रमांक : १५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष : १,५१,९९०
महिला : १,४०,९७२
तृतीयपंथी : ७
एकूण मतदान २,९२,९६९

- Advertisement -

विद्यमान आमदार : शिरीषदादा चौधरी, अपक्ष

२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची हवा जरी असली तरी अपक्ष म्हणून उभे असलेले शिरीष चौधरी यांनी भाजपच्या अनिल पाटील यांचा पराभव करत विधानभवनात प्रवेश केला होता. अमळनेर मतदारसंघाच हेच वैशिष्ठ्य आहे की, स्थानिक उमेदवारपेक्षा बाहेरून आलेल्या उमेदवारावर विश्वास दाखवत त्याला निवडून देणे. गेल्या २५ वर्षापासून येथे बाहेरून आलेल्या उमेदवारांना या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत आली आहे.] या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष वाघ व विधानसभा परिषदेच्या आ.स्मिता वाघ असतांना भाजपला नगर पालिकेच्या निवडणुकी दारूण पराभव पाहावा लागला होता. मात्र, निवडणुकीनंतरी चित्र बदले. त्यामुळे येथील शहरातील मतदारांनी भाजपला नगर पालिकेत नाकारले होते हे सत्य आहे. पारोळ्याचे साहेबराव पाटील अपक्ष निवडुण आले,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले असता पराभव झाला आणि अपक्ष नंदुरबारचे शिरिष चौधरी हे विजयी झाले.त्यांनी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीनंतर भाजपाला समर्थन दिले आहे.त्यामुळे यावेळी या विधानसभेची जनता आपल्या परंपरेप्रमाणे अपक्षांना विजयी करणार की पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणार हे तर निवडणूकीच्या निकालानंतर समजेल.

अमळनेर विधानसभा मतदारसंघ आमदार शिरीष दादा चौधरी

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

शिरीष चौधरी – अपक्ष – ६८,१४९
अनिल पाटील – भाजप – ४६,९१०


हे देखील वाचा – जळगाव लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -