घरमहा @२८८७० हजार रिक्त जागा भरणार ; उद्धव ठाकरे घेणार लवकरच निर्णय

७० हजार रिक्त जागा भरणार ; उद्धव ठाकरे घेणार लवकरच निर्णय

Subscribe

७० हजार रिक्त जागा भरणार ; उद्धव ठाकरे घेणार लवकरच निर्णय

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या घोषणांची पूर्तता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. वेगवेगळ्या विभागातील जवळपास ७० हजार रिक्त जागा भरण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असल्याचं समजतंय. बुधवारी ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये या रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, लवकरच या रिक्त पदांच्या भरतीचा विचार केला जाणार आहे.

ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत. त्यामुळे, तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. त्यानुसार, आता ठाकरे सरकार ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्याच्या विचाराधीन आहेत.

- Advertisement -

यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ मध्ये विविध विभागात ७२ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, २०१८ मध्ये ३६ हजार आणि २०१९ मध्ये ३६ हजार पदं भरली जाणार होती. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाईल असं त्यावेळी घोषित करण्यात आलं होतं. पण, लोकसभेची आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती प्रक्रिया थांबली होती. पण, आता उद्धव ठाकरे यांचं सरकार या भरतीची प्रक्रिया राबवणार असल्याचं समोर आलं आहे.

कोणत्या विभागात किती जागांची भरती होईल?

ग्रामविकास : ११ हजार
गृह विभाग : ७ हजार १११
कृषी विभाग : २ हजार ५००
पशु व दुग्ध संवर्धन विभाग : १ हजार ०४७
सार्वजनिक बांधकाम : ८ हजार ३३०
जलसंपदा : ८ हजार २२०
जलसंधारण : २ हजार ४३३
नगरविकास : १ हजार ५००
आरोग्य : १० हजार ५६०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -