हिंगोली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९४

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली (विधानसभा क्र. ९४) विधानसभा मतदारसंघ आहे.

Hingoli
हिंगोली विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९४
hingoli assembly constituency

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आणि आठवे ज्योर्तिंलिंग म्हणून प्रसिद्ध असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली मतदारसंघात येते. १९६२ साली पहिल्यांदा काँग्रेसचे नारायणराव लिंबाजीराव यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर बराच काळ काँग्रेसनेचे इथे सत्ता राखली होती. १९९९ पासून ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर हे या मतदारसंघातून निवडून येत होते. हिंगोली विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका जातीचे प्राबल्य नाही. आतापर्यंत केवळ एकदाच आशाबाई टाले या ओबीसी समाजाच्या आमदार निवडून आलेल्या आहेत. बाकी सर्वकाळ मराठा समाजाच्या उमेदवाराचीच चलती राहिलेली आहे.

मतदारसंघ क्रमांक – ९४

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५०,३६४
महिला – १,३२,८५९
एकूण मतदान – २,८३,२२३

विद्यमान आमदार – तानाजी मुटकुळे, भाजप

२०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तानाजी मुटकुळे यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव करत जायंट किलरची भूमिका वठवली होती. मध्यंतरी हिंगोली शहरात शेतकरी मेळाव्याच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना तानाजी मुटकुळे स्टेजवरून खाली पडले होते. याचा व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला होता.

Tanaji Mutkule
आमदार तानाजी मुटकुळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) तानाजी मुटकुळे, भाजप – ९७,०४५
२) भाऊराव पाटील, काँग्रेस – ४०,५९९
३) दिलीप चव्हाण, राष्ट्रवादी – २१,८९७
४) साहेबराव सिरसाट, बसपा – ९७३१
५) दिनकरराव देशमुख, शिवसेना – ६,३९७


हे वाचा – हिंगोली लोकसभा मतदारसंघ