घरमहा @२८८नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५५

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५५

Subscribe

नागपूर जिल्ह्यात नागपूर मध्य (विधानसभा क्र. ५५) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारहसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात २००९ पर्यंत काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली. मात्र, २००९ पासून या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे.

मतदारसंघ क्रमांक – ५५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५०,०७६
महिला – १,४२,६३६
एकूण मतदार – २,९२,७१६

- Advertisement -

विद्यमान आमदार – विकास शंकरराव कुंभारे, भाजप

विकास शंकरराव कुंभारे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी २००९ साली सर्वात पहिल्यांदा भाजप पक्षातून नागपूर मध्य मतदारसंघात निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती. मात्र, विकास कुंभार यांनी काँग्रेसच्या विजयाची परंपरा मोडली. २००९ साली ते या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी २०१४ साली पुन्हा त्यांनी उमेदवारी लढवली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला.

mla vikas kumbhare
विद्यमान आमदार विकास कुंभारे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विकास कुंभारे, भाजप – ८७,५२३
२) अनिस अहमद, काँग्रेस – ४९,४५२
३) ओंकार अजिंकर, बसप – ५,५३५
४) कामिल अन्सारी, राष्ट्रवादी – ४,८१८
५) अभाणिजू पांडे, अपक्ष – ४,४४९


हेही वाचा – नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -