नांदगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११३

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव (विधानसभा क्र. ११३) विधानसभा मतदारसंघ आहे.

Nashik

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नांदगाव आणि मनमाड या दोन प्रमुख नगरपालिकांचा समावेश या मतदारसंघात आहे तसेच मालेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटाचा देखील समावेश आहे. कायम दुष्काळी असलेल्या या भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. मनमाड मध्ये दरवर्षी वर्षभर पाणी टंचाई असते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आमदार असलेल्या या मतदारसंघात मराठा, वंजारी, बंजारा, माळी, नवबौद्ध समाजाचे प्रबल्या दिसून येते. भुजबळांमुळे नाशिक जिल्ह्यात या मतदारसंघाची ओळख तयार झालेली आहे.

मतदारसंघ क्रमांक – ११३

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या

 • पुरुष : १,६४,५९६
 • महिला : १,५०,४१९
 • तृतीयपंथी – १
  एकूण मतदान ३,१५,०१६

विद्यमान आमदार : पंकज भुजबळ, आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र म्हणून पंकज भुजबळ यांची ओळख निर्माण झाली. येवल्यातून छगन भुजबळ तर त्या मतदारसंघालाच लागून असलेल्या नांदगाव मतदारसंघात पंकज भुजबळ यांनी आपली राजकीय मुहुर्तमेढ रोवली. २००९च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आमदार संजय पवार यांचा तर २०१४ च्या निवडणुकीत सध्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पद भूषवित असलेल्या सुहास कांदे व अद्वय हीरे यांना पराभवाची धूळ चारत सलग दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम रचला आहे.

2014 विधासभा निवडणुकीतील परिस्थिती

 • पंकज भुजबळ (राष्ट्रवादी): 69,263
 • सुहास कांदे (शिवसेना): 50,827
 • अव्दय हिरे (भाजप): 50,351
 • अ‍ॅड.अनिल आहेर (काँग्रेस): 16,464

2019 लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती

 • डॉ.भारती पवार (भाजप): 1,15,336
 • धनराज महाले (राष्ट्रवादी):40,425
 • आमदार जे. पी. गावित (माकप): 4,192
 • बापू बर्डे (वं.ब.आघाडी): 15,446

हे ही वाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ