रायगडमध्ये २५ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

Raigad
25 year old Govinda death in Raigad
प्रातिनिधिक फोटो

राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना रायगडच्या म्हसळा तालुक्यातील खरसईमध्ये दुखद घटना घडली आहे. दहीहंडीच्या दुसऱ्या थरावरून पडून २५ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील खरसई येथे ही घटना घडली. अर्जुन लक्ष्मण खोत असे मृत्यू पावलेल्या गोविंदाचे नाव आहे. दहीहंडी फोडत असताना अर्जुन दुसऱ्या थरावरुन खाली कोसळला. त्यांनंतर त्याला म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.