घरमहाराष्ट्रराज्यात २६०८ नवे रुग्ण

राज्यात २६०८ नवे रुग्ण

Subscribe

६० करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शनिवारी राज्यात तब्बल २६०८ नवीन रुग्ण सापडले असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार १९० झाली आहे. त्याचप्रमाणे ६० जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबाधित मृतांची संख्या १५७७ वर पोहोचली. शनिवारी ८२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत १३ हजार ४०४ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात ६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली आहे. त्यामध्ये मुंबईत ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, सातार्‍यात १, ठाणे १ तर नांदेड १ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत. मृतांमध्ये ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,४८,०२६ नमुन्यांपैकी २,९८,६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७,१९०जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,८५,६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३,५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत १५६६ नवे रुग्ण ,४० कोरोनाबाधितांचा मृत्यू
मुंबईत शनिवारी १५६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ६३४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९४९ वर पोहचला आहे.

- Advertisement -

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून शनिवारी मुंबईमध्ये तब्बल १५६६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ६३४ वर पोहचली आहे. १९ ते २१ मे पर्यंत झालेल्या २९२ चाचण्यांचा पॉझिटिव्ह अहवाल शनिवारी आल्याने त्यांचाही यात समावेश आहे. मुंबईमध्ये ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९४९ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या ४० जणांमधील २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २५ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चौघांचे वय ४० वर्षांखालील, २१ जण हे ६० वर्षांवरील, तर १५ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे १०५९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २४ हजार ३२३ वर पोहचली आहे. तसेच ३९६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७४७६ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -