Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात ३,१६० नवे रुग्ण, ६४ जणांचा मृत्यू

राज्यात ३,१६० नवे रुग्ण, ६४ जणांचा मृत्यू

राज्यात आज ६४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,७५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात ३,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,५०,१७१ झाली आहे. राज्यात ४९,०६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ६४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,७५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, पनवेल ५, नाशिक ५, अहमदनगर ३, पुणे ७, सातारा ३, अकोला ३, यवतमाळ ५, नागपूर ३ आणि चंद्रपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ६४ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

- Advertisement -

आज २,८२८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,५०,१८९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,६१,९७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५०,१७१ (१४.९३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,५५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -