घरताज्या घडामोडीब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री

ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री

Subscribe

ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरस आता अनेक देशांमध्ये पसरत आहे. भारतात या नव्या कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला असून आता महाराष्ट्रात नव्या कोरोनाने एंट्री झाली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नव्या कोरोनाची लक्षणे आढळली आहे. यामध्ये मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येक एक जणांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

- Advertisement -

 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा येथे कोरोना लसीकरणाबाबत बैठक घेतली. तसेच ब्रिटनहून आलेल्या ८ प्रवाशांना नव्या व्हायरसची लागण झालेली आहे, त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली आणि अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ४२ हजार १३६ आहे. यापैकी आतापर्यंत ४९ हजार ६६६ जणांचा मृत्यू झाला असून १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५४ हजार ३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान नव्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने २१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. पण या कालावधीपूर्वी ब्रिटनहून आलेल्या रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत ३८ रुग्णांमध्ये नव्या कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली आहेत.


हेही वाचा – मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर बनणार आता लसीकरण केंद्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -