राज्यात ८५२२ नवे रुग्ण, १८७ जणांचा मृत्यू

राज्यात ८५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,४३,८३७ झाली आहे.

राज्याची आकडेवारी

राज्यात ८५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,४३,८३७ झाली आहे. राज्यात २,०५,४१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १८७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ७०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात आज १८७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३८, ठाणे ६, नवी मुंबई मनपा १०, कल्याण डोंबिवली मनपा ३, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा १, रायगड २, नाशिक ५, अहमदनगर २, जळगाव ३, पुणे १६, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ८, सातारा ९, कोल्हापूर ३, सांगली ७, रत्नागिरी २, औरंगाबाद १, लातूर ७, उस्मानाबाद ३, नांदेड २, अमरावती ३, नागपूर १९ आणि अन्य १ यांचा समावेश आहे.

आज १५,३५६ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत १२,९७,२५२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७७,६२,००५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,४३,८३७ (१९.८९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,३७,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,८५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.