बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई; १७ जणांना अटक

अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदा दारु विक्री करणाऱ्या २२ दुकानांवर कारवाई करत दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

Ahmednagar
Action against illegal liquor sales
बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई

सध्या निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणूकीच्या काळात बेकायदा दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील अनेक ठिकाणी बेकायदा दारु विक्री केली जाते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदा दारु विक्री करणाऱ्या २२ दुकानांवर कारवाई करत दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदा दारू विक्रीवर धडक कारवाई करण्यात येत आहे. शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघात रामनवमी आणि आंबेडकर जयंती या कालावधीत २२ गुन्हे नोंदविण्यात येऊन १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. २४ दारू दुकानांमध्ये जास्त मद्यविक्री झाली असून या दुकानांची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.