आठवडा बाजाराला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा

"शेतातील भाजी थेट आपल्या दारी" हा उपक्रम शेतकरी व ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन अभिनेते व नाम फाउंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी ठाण्यात केले.

Thane
makrand anaspure
अभिनेते व नाम फाउंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे

महाराष्ट्रात यंदा दुष्काळ आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर “शेतातील भाजी थेट आपल्या दारी” हा उपक्रम शेतकरी व ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन अभिनेते व नाम फाउंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी ठाण्यात केले. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने, त्यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून व कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने कोलबाड परिसरात सातव्या शेतकरी आठवडा बाजाराचे उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

शनिवार, रविवार भरतो बाजार

ठाण्यात आ. केळकर यांच्या पुढाकाराने एकूण सात ठिकाणी दर शनिवार व रविवार आठवडा बाजार भरत आहेत. गेल्या दोन वर्षात ठाणेकरांनी सातही आठवडी बाजारास उत्तम प्रतीसात दिला असून आत्तपर्यंत त्यांनी या दोन वर्षात २००० टन च्या आसपास ताजी भाजी खरेदी केली आहे. थेट शेतात्तील कोथिंबीर, मिरची, भेंडी, गवार, घेवडा, कोबी, फ्लॉवर, ढोबी मिरची, दुधी, फरसबी, टोमाटो, भोपळा, कांदा, बटाटा आदी २७ प्रकारच्या अनेक भाज्या ठाणेकरांना बाजारभावापेक्षा स्वस्त मिळू लागल्याने ते खुश आहेत. चवळी, शेपू, पालक, मेथी कांद्याची पात आदींसारख्या पालेभाज्यांचाही समावेश यात आहे. कोलबाड येथील आठवडा बाजरात नाशिक, जुन्नर, शहापूर सिन्नर आदी ठिकाणचे शेतकरी या आठवडा बाजारात सहभागी झाले आहेत.

पहिला आठवडा बाजार ठाण्यातील गावदेवी मैदानात

सरकारने धान्यांवरचे निर्बंध उठवल्यामुळे काही आठवडा बाजारात तांदूळ, ज्वारी, बाजरी, तुरडाळ, मुगडाळ, चणाडाळ, नाचणी, जवस व कडधान्यांची विक्री होत असल्याची माहिती आ. केळकर यांनी देवून कोलबाड आठवडी बाजारातही लवकरच धान्य विक्रीस येईल अशी माहिती देवून महाराष्ट्रातील पहिला आठवडा बाजार ठाण्यातील गावदेवी मैदानात भरविण्यात आला. त्याला ११० च्या आठवडे पूर्ण झाले असून ठाणेकरांनी सुमारे ७०० टन च्या वर भाजी खरेदी करून त्याला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आ. संजय केळकर यांनी ठाणेकरांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या भाजीपाला दलालांच्या बेड्यातून मुक्त करणारा हा उपक्रम ठाणेकरांनी उचलून धरल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.