घरमहाराष्ट्रमतदानासाठी प्रशासनाकडून तयारी

मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी

Subscribe

15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक

32 रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होत असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मुख्य लढत शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यामध्ये असून जोरदार आरोपप्रत्यारोपानंतर कुणाचे पारडे अधिक जड होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून 15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघातील 16 लाख 51 हजार 560 मतदार 2 हजार 179 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 ते 19 या वयोगटातील 35 हजार 452 नवे मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 7 मतदान केंद्र महिला चालविणार आहेत. एक केंद्र दिव्यांग कर्मचारी संचलित आहे. 10 मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. 2 हजार 228 पोलीस कर्मचारी व 800 गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

यावेळी 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनंत गीते (शिवसेना), सुनील द. तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी), सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), मिलिंद भागुराम साळवी (बहुजन समाज पार्टी), मधुकर महादेव खामकर (अपक्ष), संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महा पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), संजय अर्जुन घाग (अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष) व मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8 लाख 9 हजार 344 आणि महिला 8 लाख 42 हजार 214, तर तृतीयपंथी 3 आहेत. पेण 3 लाख 76, अलिबाग 2 लाख 92 हजार 421, श्रीवर्धन 2 लाख 56 हजार 180, महाड 2 लाख 84 हजार 230, दापोली 2 लाख 79 हजार 238, गुहागर 2 लाख 39 हजार 415 अशी मतदारांची संख्या आहे. 18 ते 19 या वयोगटातील 35 हजार 452 नवे मतदार मतदान करणार आहेत. 7 हजार 394 दिव्यांग असून, एकूण मतदान केंद्रांपैकी 1 हजार 724 मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार असणार आहेत. या दिव्यांगांमध्ये 850 अंध (क्षीण दृष्टी), 545 कर्णबधीर, मूकबधीर 276, अपंग 3 हजार 37 आणि इतर दिव्यांग 1 हजार 986 आहेत.
एकूण 2 हजार 179 मतदान केंद्रे आहेत. 1 हजार 996 ग्रामीण भागात, तर 183 शहरी भागात आहेत. पेणमध्ये 375, अलिबाग 377, श्रीवर्धन 351, महाड 392, दापोली 363, गुहागरमध्ये 321 मतदान केंद्रे आहेत. 1 हजार 495 मतदान केंद्रे ही रायगड जिल्ह्यातील, तर उर्वरित 684 मतदान केंद्रे ही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

मतदान केंद्रावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ तालुक्यातून ने-आण करण्यासाठी 548 एसटी बसेस, 80 मिनी बसेसची व्यवस्था केली आहे. निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. एकूण बॅलेट युनिटस् 5 हजार 103, कंट्रोल युनिटस् 2 हजार 524, व्हीव्हीपॅट 2 हजार 664 असतील. रँडमायझेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही मतदान यंत्रे ने-आण करणार्‍या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -