घरमहाराष्ट्रआदिवासी महिलांना रानभाज्यांचा आधार

आदिवासी महिलांना रानभाज्यांचा आधार

Subscribe

पालघर जिल्ह्यात पावसाळ्यानंतर डोंगर दर्‍यांमध्ये अनेक रानभाज्या उगवू लागल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासींना सध्या रोजगार मिळू लागला आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये रानभाज्या विकणार्‍या आदिवासी महिला दिसू लागल्या आहेत.

भाजा पिकवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जात असतो. मात्र, रानभाज्या डोंगर दर्‍यांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असल्याने त्यांना मोठी मागणी असते. दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये रानभाज्या विकणार्‍या आदिवासी महिला दिसतात. त्यामुळे आदिवासींना यातून तात्पुरता का होईना रोजगार मिळतो.

- Advertisement -

यंदाही ग्रामीण भागातून येणार्‍या रानभाज्यांना येथील ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. या रानभाज्या उजैनी, आखाडा, मोखाडा, खोडाळा अशा अती दुर्गम भागातील महिला विक्रीसाठी घेऊन येत आहेत. एकीकडे भाज्यांचे दर तीनपट वाढले असल्याचे दिसत असताना रानभाज्या मात्र दहा, वीस रुपये जुडी याप्रमाणे विकल्या जात असल्याने भाज्यांना मागणीही वाढत आहे.

रोज पाचशे ते आठशे रुपये उत्पन्न मिळत असल्याचे सूर्यमाळहून आलेल्या हिरा मावशी यांनी सांगितले. पावसाळ्यात मजुरीचे काम मिळत नसल्याने जंगलात जाऊन भाज्या गोळा करून विकते त्यातूनच संसाराला थोडा फार आधार मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -