घरमहाराष्ट्रयुतीचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर १३ गुन्हे दाखल

युतीचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर १३ गुन्हे दाखल

Subscribe

शिवसेना- भाजपचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मतदारांनी याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. या प्रचारा दरम्यान शिवसेना- भाजपचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘मी गेली १५ वर्षे राजकारणात आहे. मात्र माझ्यावर एक ही गुन्हा नाही. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मतदारांनी याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी केले असून ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तरुणांना पारदर्शक राजकारण पाहिजे

‘आजच्या जनतेला विशेष करून तरुणांना पारदर्शक राजकारण पाहिजे आहे. मी ही गेली १५ वर्षे राजकारणात आहे. मी नेहमीच पारदर्शक राजकारण आणि समाजकारण करत आलेलो आहे. या १५ वर्षात माझ्यावर एक ही गुन्हा नाही आहे. मुंबईतील मतदारांना स्वच्छ चारित्र्याचा खासदार पाहिजे आहे. दक्षिण मुंबईतील शिवसेना भाजपचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर १३ वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मतदारांनी याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा’, असे वक्तव्य देवरा यांनी केले आहे.

- Advertisement -

आपल्या पदाचा आणि सरकारचा दुरुपयोग

जो उमेदवार निवडणूक लढवीत आहे, त्यांनी आपल्यावरील गुन्हयांची माहिती जाहीर करावी, हे निवडणूक आयोगाने सक्तीचे केलेले आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांनी निवडणूक अर्ज भरताना जे प्रतिज्ञा पत्र निवडणूक आयोगाला सादर केले त्यामध्ये हे नमूद केलेले आहे कि त्यांच्यावर १३ वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये प्रचार करताना आश्वासन दिले होते कि Fast Track Court स्थापन करून त्यांच्या खासदारांवरील सर्व गुन्हयाचे निकाल लवकरात लवकर लावणार. त्यानुसार अरविंद सावंत यांच्यावर Fast Track कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान अरविंद सावंत हे १६ वेळा तारखांना हजर राहिलेले नाहीत. तेव्हा २७ मार्च रोजी कोर्टाकडून त्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे. ते कोर्टात अनुपस्थितीचे कारण सांगतात कि, ते राज्य सरकार आणि पोलिसांशी चर्चा करून हे १३ कलमे रद्द करण्याच्या तयारीत आहेत म्हणजेच पुन्हा या पदाचा आणि सरकारचा दुरुपयोग करत आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर उपस्थित होते.


वाचा – सुपारी किलर पाहिले पण भाषण पाहिले नाही – जावडेकर

- Advertisement -

वाचा – ‘डासभाऊ’ काय प्रकार आहे? काँग्रेस का घेरतेय उद्धवना?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -