घरमहाराष्ट्रAPMC निवडणुकीत मतपत्रिका जळाल्या; कल्याणमधील प्रकार

APMC निवडणुकीत मतपत्रिका जळाल्या; कल्याणमधील प्रकार

Subscribe

कल्याममध्ये APMC निवडणूकीत मतपत्रिकेला आग लागण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पार पडलेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले. मात्र शेतकरी मतदार संघातल्या गण क्रमांक १२ मधील मतपेटी सील करीत असतानाच अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. त्यात काही मतपत्रिका जळाल्या आहेत. त्यामुळे सर्वपक्षीयांनी समितीच्या आवारात तीव्र संताप व्यक्त करीत फेरनिवडणूक तसेच पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने रविवारी १६ जागांसाठी मतदान पार पडले. कल्याण तालुक्यातील मांडा, बल्याणी, बारावे, कल्याण,निळजे, नांदिवली तर्फे पाचनंद, फळेगाव, कुंदे, गोवेली, खडवली,टिटवाळा, बावेघर १२ गणामध्ये २९ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यापैकी एक कृषी उत्पन्न बाजार समितीत उभारण्यात आले होते. ग्रामीण भागात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपा, मनसे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली होती. मतदान केंद्रासाठी विविध उमेदवारांनी आपले बूथ उभारले होते .या बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी ठाण मांडून बसले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला आणखीनच महत्व प्राप्त झाल्याचं दिसून आलं.

- Advertisement -

हे वाचा – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे निधन

फेरनिवडणूक आणि निलंबनाची मागणी…

कृषी उत्पन्न् बाजार समिती निवडणुकीचे मतदान संध्याकाळी साडेपाच वाजता संपले. मतदान संपल्यानंतर शेतकरी मतदार संघातल्या गण क्रमांक १२ मधील मतपेटी सील करीत असतानाच अचानक आग लागल्याने मतपत्रिका जळाल्याचा प्रकार घडला. हा प्रकार समजताच सर्वपक्षीयांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली. आमदार गणपत गायकवाड यांची पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिका-यांबरोबर बाचाबाची झाली. मतपेटी सील करताना उमेदवारांना का बोलाविण्यात आले नाही असा जाब त्यांनी विचारला. निवडणूक आयोग व पेालीस यांची सेटींग असल्योन त्यांना निलंबीत करण्याची मागणी आमदारांनी केलीय. मतपत्रिका जळाल्याने याविषयी संशय व्यक्त करीत राष्ट्रवादी शेकाप युतीच्या उमेदवार भीमराव पाटील यांनी फेर निवडणुकीची मागणी केली आहे.

- Advertisement -

२९ पैकी २८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र १२ व्या गणातील मतपेटी स्ट्राँग रूमध्ये नेत असतानाच पेटीतून अचानक धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने या मतपेटीचे सील उघडून पाहणी केली असता मतपेटीतील मतपत्रिका जळत असल्याचे लक्षात आले हा प्रकार कसा घडला हे सांगता येत नाही. मात्र याबाबतचा सविस्तर अहवाल निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. – शहाजी पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -