घरमहाराष्ट्रबांग्लादेशी तरुणीला आश्रय देणाऱ्या जोडप्याला अटक

बांग्लादेशी तरुणीला आश्रय देणाऱ्या जोडप्याला अटक

Subscribe

बांग्लादेशी तरुणीने मागील काही वर्षांपूर्वी भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला होता.

एका बांग्लादेशी तरुणीला आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीसोबत तिला आश्रय देणाऱ्या प्रेमी युगलालालही अटक केली आहे. ही कारवाई ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष या पथकाने केली आहे. ही बंग्लादेशी तरुणी अनैतिकपणे भारतात आली आहे. तिच्याजवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाहीत. तरीही डोंबिवलीतील निळजे गावातील एका प्रेमी युगलाने तिला आश्रय दिला होता. या गोष्टीची खबर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष या पथकाला लागताच त्यांनी निळजे गावातील या पती-पत्नीच्या घरावर छापा टाकला. तिथे त्यांना ही बांग्लादेशी मुलगी सापडली. त्यांनी ताबडतोब त्या मुलीला आणि प्रेमी युगलाला अटक केली.

हेही वाचा – बांग्लादेशीय घुसखोरांवर ठाणे पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी तरुणीचे नाव अंजु हाशिम बेपारी उर्फ अंजु हाशिम सरकार (२०) असे आहे. या तरुणीला शिरीन उर्फ राणी शरिफुलइस्लाम शेख (२४) आणि नितीन पाटील(२७) यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. शिरीन आणि नितीन या दोघांमध्ये प्रेमसंबंध असून ते डोंबिवलीच्या लोढा हेवन येथील निळजे गावाचे रहिवाशी आहेत. अंजुने मागील काही वर्षांपूर्वी भारतात कागदपत्रांशिवाय बेकायदेशीररीत्या प्रवेश केला होता. भारतात आल्यानंतर तीला पाटील आणि शिरीन या जोडप्याने बेकायदेशीरपणे स्वतःच्या घरी आश्रय दिला होता. एक बांग्लादेशी महिला लोढा हेवन येथील निळजे या गावात बेकायदेशीर राहत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांना मिळाली. माहितीच्या आधारे दौडकर यांनी पोलीस पथकासह नितीन पाटील राहत असलेल्या निळजे गावात मंगळवारी छापा टाकून अंजु या बांग्लादेशी तरुणीला ताब्यात घेतले. त्याचबरोबर तिला आश्रय दिल्याप्रकरणी नितीन पाटील आणि त्याची प्रेयसी शिरीन यांना देखील अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – बांग्लादेशच्या माजी पंतप्रधानांना ७ वर्षाची शिक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -