घरदेश-विदेशबांग्लादेशीय घुसखोरांवर ठाणे पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक ....

बांग्लादेशीय घुसखोरांवर ठाणे पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक ….

Subscribe

दोन वर्षात ७१ घुसखोर बांग्लादेशीयांवर कारवाई

देशाच्या सुरक्षिततेला धोका असलेल्या बांगलादेशीयांनी मुंबईबरोबर ठाण्यातही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. मात्र ठाणे पोलिसांनी घुसखोर बांगलादेशीय नागरिकांवर सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने गेल्या दोन वर्षांत सुमारे ७१ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर धडक कारवाई केली. विशेष म्हणजे यामध्ये बांगलादेशी महिलांना तीन वर्षांची शिक्षाही झाली आहे. मागील वर्षी बांगलादेशीयांविरोधात ६ केसेस दाखल झाल्या होत्या.

त्यात २४ पुरूष आणि १५ महिला असे एकूण ३९ जणांना अटक करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून कडक कारवाई झाली आहे. तसेच लग्नाचे अथवा पैशाचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या १० अल्पवयीन मुलींची परराज्यातून सुटका करण्यात ठाणे पोलिसांनी यश मिळवले आहे. इतकेच नव्हेतर ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील ७ हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

महिला, तरूणींना चुकीचे काम लावणे, इतर राज्यातून किंवा अन्य देशातून तरूण मुलींना पळवून आणून त्यांना शरीरविक्रीच्या काळ्या धंद्यात ढकलले, तरूण मुलींचे अपहरण करून त्यांना अन्य राज्यात पाठवणे, वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती करणे, लहान मुलांची विक्री करणे आदी गुन्ह्यांसाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जातेे. यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाणही अधिक आहे.

बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही देशवासियांसाठी डोकेदुखी ठरली आहे. तसेच वेश्या व्यवसायात बांगलादेशी महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बांग्लादेशीयांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. गेल्या नऊ महिन्यात पीटा कायद्यान्वये २६ गुन्हे दाखल झाले होते. त्यात ६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या ६६ पैकी ९ अल्पवयीन आणि २ बांगलादेशीचा समावेश आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी लहान मुलांच्या विक्रीची ठाणे आणि भिवंडीत दोन प्रकरणे उघडकीस आली होती. अवघ्या २० हजार रूपयांना पाच वर्षांच्या मुलीची विक्री करीत असतानाच पोलिसांनी एका महिलेला अटक केली. तर दुसर्‍या प्रकरणात सहा दिवसाच्या बालकाला २ लाख रूपयांना विक्री करणार्‍या चौकडीला पोलिसांनी बेडया ठेाकल्यात. यंदाच्या वर्षी मुलांच्या विक्रीचे प्रकार घडलेले नाहीत. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक शाखेने ही कामगिरी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -