घरमहाराष्ट्रभाजपाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

भाजपाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपाने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदरांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपाने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदरांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आले आहे. तर दिंडोरीतून नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

या विद्यमान खासदारांचा पत्ता कट

विद्यमान खासदारांमध्ये पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील या सहा उमेदवारांचा समावेश 

  • पुणे – गिरीश बापट
  • नांदेड – प्रताप चिखलीकर
  • जळगाव – स्मिता उदय वाघ
  • दिंडोरी – डॉ. भारती पवार
  • बारामती – कांचन राहुल कुल
  • सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी

तिसऱ्या यादीतही सोमय्यांना स्थान नाही

किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा विरोध असल्याने तिसऱ्या यादीत देखील त्यांचा समावेश करण्यात आला नाही. भाजप मुंबईतील एकूण सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -