शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं चालते का?, मुनगंटीवारांचा सवाल

‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन विरोधक नीच दर्जाचे राजकारण करत आहेत. कारण शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं यांना चालत का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Mumbai
Sharad Pawar and Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार आणि शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या पुस्तकावर चहुबाजूंनी टीका होत असतानाच सत्ताधाऱ्यांकडून देखील याला विरोध होत असून भाजपाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. याच टीकेवर भाजपाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांना स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यावर ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपमा शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी देखील त्यांना जाणता राजा ही उपामा लागू होते का?’,असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन विरोधक राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांकडू अत्यंत नीच दर्जाचे राजकारण केले जात आहे. शरद पवारांना शिवाजी महाराजांची उपमा दिली जाते. त्याचप्रमाणे शरद पवारांवर जाणता राजा नावाने पुस्तक देखील निघाले. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात ३५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. तरी देखील त्यांना जाणता राजा म्हटलेले चालते का?’, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘इंदिरा गांधींनी जेव्हा बांगलादेशविरोधातील युद्ध जिंकले तेव्हा त्यांना दुर्गादेवीचा अवतार म्हणण्यात आले होते. दुर्गादेवीची बरोबरी इंदिरा गांधी कधीच करु शकत नाही, हे माहिती होते. पण एखाद्या व्यक्तीचा गौरव करताना, असे वक्तव्य अनेकदा केले जाते. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’, असेही म्हणण्यात आले होते. ते चालले का?, असे एक ना अनेक प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले आहेत.

‘या देशात शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणे शक्यच नाही. तसेच जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत कोणीही त्यांची तुलना करु शकत नाही. नरेंद्र मोदीदेखील करु शकत नाहीत. पण मोदी देशाला ज्याप्रमाणे विकासाच्या मार्गावर नेत आहेत, देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक जटील प्रश्न सोडवले त्यामुळेच त्यांच्याबद्दल घाणेरडे राजकारण केले जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.


हेही वाचा – ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here