घरमहाराष्ट्रमहाविकासआघाडीचा भाजपला 'दे धक्का'; लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर

महाविकासआघाडीचा भाजपला ‘दे धक्का’; लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर

Subscribe

भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला मतदान केल्याने भाजपचा पराभव झाला.

लातूरमध्ये भाजपचे माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांना मोठा झटका बसला आहे. लातूरच्या महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे. लातूर महापालिकेची सत्ता भाजपकडून काँग्रेसने हिसकावली आहे. भाजपचे अॅड. शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते पडली असून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. तर काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ मते पडली आहे. अवघ्या दोन मतांनी भाजपच्या अॅड. शैलेश गोजमगुंडे यांचा काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांनी पराभव केला आहे.

भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांनी काँग्रेसला मतदान केल्याने भाजपचा पराभव झाला. अडीच वर्षातच लातूर महापालिकेत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीच्या राजा मणियार यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. या बैठकीस काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित असून भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. म्हणून बैठकीस फक्त ६८ सदस्य उपस्थित होते. लातूर महापौर पदाच्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. ६८ पैकी ३५ मतांनी विक्रांत गोजमगुंडे यांचा विजय झाला असून यानंतर मनपा कार्यलयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -