घरमहाराष्ट्रकाँग्रेसने केली महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने केली महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Subscribe

काँग्रेसच्या लोकसभेसाठीची दुसरी यादी अखेर बुधवारी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पाच जागेंसह एकूण २१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या काँग्रेसच्या लोकसभेसाठीची दुसरी यादी अखेर बुधवारी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील पाच जागेंसह एकूण २१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुंबईसाठी दक्षिण मुंबईतून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांना तर उत्तर मुंबईतून प्रिया दत्त यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टीका करुन भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पाटेले यांच्यासह नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍या खासदार सावित्री फुले यांना देखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ही यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जाहीर केली होती पहिली यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे गेल्याच आठवड्यात पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांचे लक्ष दुसर्‍या यादीकडे लागून राहिले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी गुजरात येथे झालेल्या हायकंमाडच्या बैठकीत दुसर्‍या यादीवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीच ही यादी जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र लांबणीवर गेलेली ही यादी अखेर बुधवारी काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी ही दुसरी यादी जाहीर केली. यात एकूण २१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले असून मुंबईतील दोन जागांसाठी तर महाराष्ट्राच्या एकूण पाच जागा यात जाहीर करण्यात आले आहेत. यात मुंबईसाठी मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -